मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

तौक्ते वादळाने जाताजाता मुंबईला कोणती भेट दिली आहे पाहा !!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
तौक्ते वादळाने जाताजाता मुंबईला कोणती भेट दिली आहे पाहा !!

गेले ४-५ दिवस देशातील महत्त्वाच्या पश्चिम किनारपट्टीवर तौक्ते वादळाने धुमाकूळ घातला आहे. केरळ, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात या पाच राज्यांच्या किनारपट्टीवर वादळ आणि पावसाने थैमान घातले होते. तौक्तेने जाता जाता पश्चिम किनारपट्टीचं प्रचंड नुकसान केलं.

पण मुंबईला मात्र एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तशी ही समस्या पहिल्यांदा उदभवली आहे असेही नाही. दरवर्षी वादळानंतर ही समस्या उभी राहते. यावर्षीही तौक्ते वादळाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबईसमोर कचऱ्याचा प्रश्न उभा राहिला आहे. वादळ शमल्यानंतर मुंबईच्या किनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीगच्या ढीग आढळून आले. समुद्रात टाकलेला कचरा समुद्रराजाने मुंबईकरांना व्याजासकट परत केलाय.

मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर जमा झालेले कचऱ्याचे फोटो बघितले तर समुद्रात किती कचरा जमा होत असते याची जाणीव होते. महापालिका कर्मचाऱ्यांनी ६ किनाऱ्यांवरून तब्बल ६२ हजार किलो कचरा गोळा केला आहे. 

सोशल मिडीयावर देखील या गोष्टीची चर्चा झाली. अनेकांनी अनोख्या पद्धतीने यावर आपले मत व्यक्त केले. तरी देखील एक प्रश्न उरतोच, की दरवाजा आपण समुद्राकडून परत केला जाणाऱ्या कचऱ्याबद्दल बोलत राहू. पण हा कचरा टाकणे कधी बंद होणार आहे?

समुद्र आपल्या पोटात काहीच ठेवत नाही म्हणतात ना तेच खरे.

संबंधित लेख