computer

अपहरणकर्ते अडकले ट्राफिकमध्ये...पुढे काय घडलं ?

मंडळी, कधी कधी वाईट गोष्टीतून चांगल्या गोष्टी पण घडत असतात. आज आम्ही जी बातमी आणली आहे ती याच कॅटेगरीतली आहे. जास्त वेळ न दवडता गोष्ट ऐका.

मोठमोठ्या शहरात मोठमोठे ट्राफिक जाम असतात हे तुम्हाला माहित असेलच. ट्राफिक म्हणजे डोकेदुखी हे समीकरण आहे, पण याच ट्राफिकने एका माणसाचं अपहरण होण्यापासून वाचवलं आहेआहे. त्याचं झालं असं, की दिल्लीमध्ये राहणारा रिजवाल नावाचा माणूस रात्रीच्यावेळी घरी जाण्यासाठी निघाला होता. तो आपल्या कारपर्यंत जाणार इतक्यात दरोडेखोर आले आणि त्यांनी त्याची चावी हिसकावून घेतली. त्यानंतर दरोडेखोरांनी त्याला जबरदस्ती आत ढकलून कार ताब्यात घेतली.

या घटनेत दरोडेखोरांनी कार लंपास करायची आणि रिजवालचं अपहरण करण्याचा प्लॅन आखला होता. त्यांनी दमदाटी करून कार पुढे नेली, पण ते अडकले ट्राफिक जाममध्ये.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांना रिजवालच्या भावाने फोनवरून अपहरणाची माहिती दिली. कारची ओळख पटावी म्हणून त्याने सांगितलं की कारच्या पुढे "High Lander" ही अक्षरं लिहिलेली आहेत. तक्रारीनंतर अवघ्या ७ मिनिटात पोलिसांनी दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

दरोडेखोर हे दिल्लीजवळच्या उत्तम नगर येथील ट्राफिकमध्ये अडकले होते. त्यामुळे ते आयतेच पोलिसांच्या जाळ्यात अडकले. अपहरण करणाऱ्या ३ जणांपैकी तिघेही पळून जात होते, पण पोलिसांना त्यातल्या एकाला पकडण्यात यश आलंय.

तर मंडळी, सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे वाईट गोष्टीतूनही चांगल्या गोष्टी या घडतात. त्या चोरांनी आपल्या प्लॅनमध्ये ट्राफिकचा विचार केला नव्हता हे त्यांचं बॅडलक.

सबस्क्राईब करा

* indicates required