computer

या मोसमात कोणत्या प्रकारची छत्री वापरणार?

छत्र्यांचे निरनिराळे प्रकार बाजारात आलेयत. गेल्या वर्षीची छत्री या वर्षापर्यंत एकतर टिकत नाही आणि चुकून टिकली तरी, ती हरवण्याचे चान्सेस म्हणावे तितकेच असतातच. त्यामुळे उशिरात उशिरा दर दोन वर्षांनी छत्रीखरेदीचा योग हा येतोच. आज आम्ही घेऊन अलो आहोत बाजारात आलेल्या वेगवेगळ्या छत्र्यांचे प्रकार. 

तुमच्याकडे याहून वेगळी छत्री असेल तर आम्हांला कमेंटसमधून जरूर कळवा. 

नॅनो छत्री

नेहमीची दोन किंवा तीन फोल्डची छत्री जुनी झाली. आता जमाना आहे पाच घड्या होणार्‍या नॅनो छत्रीचा. ही छत्री खिशातहे बसेल इतकी लहान आणि वजनाने हलकी आणि उघडल्यावर मोठ्या छत्रीइतकीच होते.

ऑटोमॅटिक छत्री

ऑटोमॅटिक स्कूटर कशी बटन दाबून बंद करता येते तशीच ही छत्रीपण बटन दाबलं की बंद होते. विशेषत: रिक्षा किंवा गाडीत बसताना एका हाताने बॅग सांभाळत कशीबशी छत्री बंद करताना नाही म्हटलं तरी भिजायला होतंच. तो त्रास या छत्रीमुळे काहीसा टाळता येण्यासारखा आहे.

डिझायनर छत्री

हौसेला मोल नसतं. रत्नजडित मुठीची आणि दोन्ही बाजूंनी डिझाईन असलेल्या या छत्रीची किंमत आहे २२,५००रूपये!! हरवली तर मात्र छत्रीही गेली आणि पावसात भिजून कुडकुडायची वेळ येईल.

स्कूटर छत्री

नेहमीच्या प्रकारात स्कूटरवर मागे बसलेल्याने छत्री पकडून बसावं लागतं. पण तो मार्ग एकट्यानेच गाडी चालवायची असेल तर अवलंबता येत नाही. यावर्षी बाजारात अशा छत्र्या लावलेल्या स्कूटर्स दिसायला सुरूवात झालीय. 

डिझायनर छत्री

डिझायनर असली तरी ही छत्री २०००रूपयांच्या आत बाहेरच आहे. उन्हात आणि पावसाळ्यात अशा दोन्ही ऋतूंत उपयोगी पडणारी ही छत्री ऑनलाईनदेखील उपलब्ध आहे.

बबल अम्ब्रेला

ही ट्रान्सस्परंट छत्री दिसायला मस्तच आहे. पावसात न भिजताही पावसाचा आनंद या छत्रीत घेता येईल. फक्त कुणाला चुकवायचं असेल तर मात्र हिचा काहीएक उपयोग नाही. 

वायफाय छत्री

केरळमध्ये वाय-फाय छत्री आल्याची बातमी आहे. ते जरी या छत्रीला वायफाय छत्री म्हणत असले तरी छत्री काही वाय-फाय नाहीय. या छत्रीच्या मुठीत ब्ल्यूटूथ डिव्हाईस आहे , जे आपण आपल्या मोबाईलच्या ब्ल्यूटूथला जोडू शकतो आणि फोन बाहेर न काढताच छत्रीच्या मुठीला असलेल्या बटनाद्वारे फोनकॉल घेऊ शकतो. असं करण्यानं आपला फोन भिजण्यापासून वाचेल, पण आजूबाजूचे लोक आपलं बोलणं ऐकू शकतील हा धोका नक्कीच आहे. 

रेनबो अंब्रेला

कारमधून फिरायचं असल्यास छत्री कितीही मोठी असली , तरी वाहून नेणं सोपं पडतं. त्यामुळं कारमधून प्रवास करणार्‍या लोकांना अशा मोठ्या आणि रंगीबेरंगी छत्री पसंत दिसते.

झालर लावलेली छत्री

पुरूषांच्या काळ्या छत्र्या सहज चोरीला जातात. उलटपक्षी स्त्रियांच्या आणि रंगीबेरंगी छत्र्या चोरल्या गेल्या तरी त्या लपवणं इतकं सहज शक्य नसतं. आजकाल लांब दांड्याच्या, फुलांची नक्षी असलेल्या आणि कडेला झालर लावलेल्या छत्र्यांची खूप चलती आहे. या छत्र्या बटनाच्या छत्रीपेक्षा टिकतातही अधिक आणि प्रसंगी स्वसंरक्षणार्थही उपयोगी पडतात. 

सबस्क्राईब करा

* indicates required