आला पावसाळा: लहान बाळाच्या सर्दीपडश्यावर घरच्या घरी सोपे चार उपाय
अजून पाऊस ठिकठिकाणी पडतोच आहे. पावसाळ्यात जर सगळ्यात वाईट काय होतं माहित आहे? ढगाबरोबरच माणसांचं नाकही गळायला लागतं! मोठ्यांचं एकवेळ ठीक आहे, पण लहान बाळांना या नाक चोंदण्यानं खूप त्रास होतो आणि मग ती मोठ्यांना त्रास द्यायला लागतात. त्यात ही बाळं इतकी लहान असतात की त्यांना साधं विक्सही लावता येत नाही. म्हणून आज बोभाटा.कॉम घेऊन आलं आहे, घरच्याघरी लहान बाळाची सर्दी घालवायचे चा अगदी सोपे उपाय.
१. बाळाच्या तळपायाला हलकंसं विक्स चोळा. वरून सॉक्सही चढवले तर परिणाम आणखी लवकर दिसून येईल.
२. तव्यावर चार मध्यम आकाराच्या लसणाच्या पाकळ्या आणि थोडा ओवा भाजा. गरम असातानाच या दोन पदार्थांना एखाद्या रूमालात बांधून त्याची पुरचुंडी /पोटली बनवा. पोटली थंड झाल्यावर ती बाळाच्या उशाशी ठेवून द्या. त्या वासानेच सर्दी पळून जाईल.
३. दोन-तीन थेंब आल्याचा रस चमचाभर मधात छान मिसळा.थोड्या कोमट पाण्यातून हे मिश्रण बाळाला हळूहळू पाजा. अर्थातच हा उपाय एक वर्षाहून मोठ्या वयाच्या बाळासाठीच करा.
४. गरम पाण्यात विक्स टाकून बाथरूम बंद करा. बाथरूमभर विक्सचा घमघमाट होईल. मग बाळाला घेऊन तिथे बसा म्हणजे एकप्रकारे बाळाला विक्सची वाफ मिळेल.