गटारी पेश्शल-'रम'ची रांगडी रंगत
ग्रापा जर इटलीची ग्रामदेवता असेल तर रम कॅरेबियनच्या समुद्री हवेत गाजणारा पोवाडा आहे. ग्रापात द्राक्षाची मादक अदाकारी आहे तर रममध्ये एक रांगडा भांगडा आहे.शरीर दिवसभराच्या काबाडकष्टांनी थकले आहे आणि गरज आहे फक्त शिणवटा पळवणाऱ्या दिलाशाची तर , बाहेर गोठवणारी थंडी आहे आणि शरीराच्या आतून हलकीच आच पुरवणारी शेकोटी हवी आहे तर , आज फक्त ढोल ताशाच्या गाजेवर पावलं फुटेस्तोवर नाचायचे आहे, असा मूड बनला असेल तर , त्याला एकच उत्तर आहे रम रम आणि रम....
वेस्ट इंडीज आणि इतर कॅरेबियन देशात उगम असणारी रम साखरेच्या मळीपासून बनवली जाते पण मळीचा पोट ढवळून टाकणारा वास मात्र रमला नाही.एक मोहक दर्प आहे. स्वत:ची खास चव आहे,रंग आहे आणि मस्तीसाठी 'तत्काल' नशा पण आहे. आपल्याकडे रम अगदी खास म्हणजे ' ओल्ड मंक ' वगैरे ही लष्कराची कृपा आहे. लष्कराच्या ' कॅन्टीन प्रोविजन' लिकर कोट्याच्या यादीत एक नंबर नाव आणि एक नंबर पसंती असते ती रमला.
आता व्हाइट रम वगैरे असे नवे प्रकार आलेत पण असली रमक्कड फक्त ओल्ड मंक ह्या एकाच पंथाला शरण असतो.शेवटी रम ह्या सुंदर गाण्याच्या काही ओळी ,
Two parts love
and a pinch of good weather
And top it all off with the sun
and mix it with rum
Mmm mmm mm mm
आणखी वाचा :
गटारी पेश्शल-व्होडका водка-फ्रॉम रशिया विथ लव्ह !!
गटारी पेश्शल- अंगूरकी बेटी -ग्रापा
गटारी पेश्शल: देशोदेशीच्या दारवा !!!