या बटाट्यात राहण्यासाठी लोक १७,००० देत आहेत...एवढं काय खास आहे या बटाट्यात ??
कामापासून ब्रेक घ्यायला लोक हटके ठिकाण शोधात असतात, आज त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठीच हा लेखप्रपंच घेऊन आलो आहोत. लेखाच्या नावावरूनच तुम्हाला समजलं असेल की आम्ही कशाबद्दल बोलतोय. तर आता जास्त वेळ न घालवता या बटाट्याबद्दल जाणून घेऊया.
राव बाहेरून हा एक मोठा बटाटा वाटत असला तरी त्याच्या आत एक झक्कास घर आहे. शानदार होटेलच म्हणा ना. हा पाहा बटाट्याच्या आतला फोटो.
मंडळी, अमेरिकेत Idaho Potato Commission ही ‘आयडाहो’ राज्याच्या बटाटा उत्पादकांची एक संघटना आहे. ही संघटना बटाटा उत्पादकांच प्रतिनिधित्व करते. या संघटनेच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमिताने एक मोठा बटाटा तयार करण्यात आला होता. हा बटाटा एका ट्रकवर ठेवून तब्बल ६ वर्ष अमेरिकेत फिरवण्यात आला.
आता तो आपल्या कामातून निवृत्त झाला आहे आणि त्याचं रुपांतर करण्यात आलंय एका हॉटेल मध्ये. आयडाहोच्या ४०० एकरच्या शेतात त्याला ठेवण्यात आलं आहे. या हॉटेल मध्ये राहायचं असेल तर एका रात्रीसाठी तब्बल २४७ डॉलर्स (जवळजवळ १७,०००) मोजावे जातात. लोकांना ही आयडिया चांगलीच पसंत पडली आहे. अमेरिकेचे सेलिब्रिटीज पण या बटाट्याला भेटून गेलेत राव.
तर मंडळी, तुम्हाला अशा हटके जागी राहायला आवडेल का ?