तो गेला होता एफआयआर दाखल करण्यासाठी, पण पोलिसांनी जे केले ते बघून धक्का बसेल भौ !!

आयुष्यात काही गोष्टी अश्या घडून जातात की आपण याचा विचारही केलेला नसतो. अशीच एक घटना साकीनाका पोलीस स्टेशन मध्ये घडली. एक तरुण आपली एफ.आय.आर. दाखल करण्यास पोलीस स्टेशन मध्ये गेला असता एफ.आय.आर. दाखल करून झाल्यानंतर पोलिसांनी त्याला एक सुखद धक्का दिला.

१४ ऑक्टोबरला ‘अनिश’ आपली तक्रार घेऊन साकीनाका पोलीस स्टेशन मध्ये गेला. एफ.आय.आर. दाखल करताना अनिशने आपली माहिती पोलिसांना सांगितली आणि यातूनच पोलिसांच्या लक्षात आले की आज त्याचा वाढदिवस आहे. हे समजताच त्यांनी चक्क पोलीस स्टेशन मध्ये केक मागवला आणि त्याचा वाढदिवस साजरा केला.

या तरुणाने अर्थात हा विचारच केला नव्हता की असं काही घडेल. पण पोलिसांनी त्याला सुखद धक्का देऊन हा दिवस त्याच्या कायमचा स्मरणात राहील असा साजरा केला. यानंतर मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाउंट वरून सेलिब्रेशन्सचे फोटो प्रसारित करण्यात आले. पोलिसांच्या या कृतीचं या नंतर अनेकांनी कौतुक केलं.

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)

©बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required