प्लास्टिकच्या डस्टबीन बॅग्जवर पर्यावरणस्नेही उपाय...वाट कसली बघताय ? बनवा मग पटापट !!
मंडळी सध्या राज्यात प्लास्टिकवर बंदी घालण्यात आलेली आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, ताट, चमचे, पेले इत्यादी आता वापरता येणार नाहीत. आता सर्व सामान्य लोकांना प्रश्न पडला आहे की प्लास्टिकची पिशवी नसेल तर दररोजच्या कामात लागणाऱ्या प्लास्टिकच्या जागी काय वापरावं ? यावर बरेच उपाय आहेत राव. यातलाच एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
दररोज आपल्याला लागणारी डस्टबीन बॅग ही देखील प्लास्टिकची असते. डस्टबीन बॅगमुळे कचऱ्यात आणखी एका प्लास्टिकची अपोआप भर पडते. या डस्टबीन बॅगच्या बदल्यात आपण कागदाने तयार करण्यात आलेली पिशवी वापरू शकतो. हा कागद देखील आपल्या घरातल्या साध्या पेपरच्या रद्दीपासून तयार करू शकतो. पण ही पिशवी तयार करायची कशी ? यासाठी तुम्हाला खालील व्हिडीओ पाहावा लागेल.
थोडा लहान कागद घेतलात तर प्रवासात किंवा पिकनिकला गेल्यावर अशा बॅगमध्ये भेळ-भडंग-कुरमुरे असा कोरडा खाऊ खायला पण या पिशव्या भारी उपयोगाच्या ठरतात.
तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही प्लास्टिक बॅगला पेपर बॅगने बदलू शकता. आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही प्लास्टिक पिशवीच्या जागी कापडी पिशवीचा पर्याय निवडू शकता. जिथे प्लास्टिक पिशवी एकदा दोनदा वापरून फेकावी लागते त्याच जागी कापडी पिशवी अनेकदा वापरता येते. पर्यावरणाच्या रक्षणासाठी एवढं तर आपण करूच शकतो...काय, बरोबर ना ?