मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

या पठ्ठ्याने कारच्या धुळीतून साकारली आहेत अफलातून चित्रे...जाणून घ्या काय आहे 'डर्टी कार आर्ट' !!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
या पठ्ठ्याने कारच्या धुळीतून साकारली आहेत अफलातून चित्रे...जाणून घ्या काय आहे 'डर्टी कार आर्ट' !!

खूप दिवसांपासून कार जर एकाच जागी उभी असेल, तर तिच्यावर धुळीचा जाड थर जमा होतो. मोठ्यांना तर आपल्या कारवर जमा झालेली ही धूळ अजिबात आवडत नाही, पण लहान मुलांसाठी हा एक मजेशीर खेळ असतो. धुळीने माखलेल्या कारच्या काचेवर हे लहानगे आपलं नाव लिहितात किंवा चित्र काढतात. किंवा टारगटपणे "आता तरी धूळ पुसा" असं लिहितात. मात्र लहानपणीच्या गमतीला एका माणसाने गांभीर्याने घेत चक्क कारवर जमा झालेल्या धुळीतून एक नवीन कला शोधून काढली आहे. ज्याचं नाव आहे ‘डर्टी कार आर्ट’. नावात जरी ‘डर्टी’ असलं तरी ही कला नितांतसुंदर आहे राव.

चला तर याबद्दल आणखी जाणून घेऊ....

सुरुवात कशी झाली ?

स्कॉट वेड असं या कलाकाराचं नाव. स्कॉट अमेरिकेच्या सेन्ट्रल टेक्ससमध्ये राहतो. स्कॉटने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की एकेकाळी तो जिथे राहायचा तिथे धुळीने भरलेले रस्ते होते. या रस्त्यांमुळे तिथल्या पार्क केलेल्या कार्सवर पांढऱ्या रंगाची धूळ साचलेली असायची. स्कॉट जेव्हा कामावरून घरी यायचा, तेव्हा तो आपल्या कारच्या काचेवर चित्र काढायचा. इथूनच त्याला ‘डर्टी कार आर्ट’ ची आयडिया सुचली.

स्कॉटच्या या अद्भुत कलेसाठी त्याला लिओनार्डो ‘द विन्ची ऑफ डर्ट’ म्हणून ओळखलं जातं. त्याने काढलेली चित्रे आणि त्यातील बारकावे वाखाणण्याजोगे असतात. यासाठी लागणारी मेहनतही तेवढीच असते. कधी हातांनी तर कधी ब्रशने त्याला सतत ६ तास यावर काम करावं लागतं.

 

कारवर एवढी धूळ जमा होते का ?

डर्टी कार आर्टसाठी महत्वाची असलेली धूळ कारवर जमा होण्यासाठी अनेक आठवडे जाऊ शकतात. म्हणून स्कॉटने एक नामी शक्कल लढवली आहे. त्याने तेल आणि मातीच्या मिश्रणातून हुबेहूब धुळीसारखा दिसणारा थर बनवण्याची टेक्निक तयार केली आहे. यातून कृत्रिम धूळ तयार होते.

स्कॉटची ही अनोखी कला आता जगभरात पसरली आहे. त्याच्या कामामुळे त्याला जगभरातून मागणी येत आहे.

आता त्याच्याबद्दल आणि त्याच्या कलेबद्दल एवढं वाचल्या नंतर त्याच्या कलेचा एक नमुना तर बघावाच लागेल राव. चला तर बघूयात ‘डर्टी कार आर्ट’ चे ११ अफलातून नमुने :

या पठ्ठ्याने कारच्या धुळीतून साकारली आहेत अफलातून चित्रे...जाणून घ्या काय आहे 'डर्टी कार आर्ट' !! – चित्र 1
या पठ्ठ्याने कारच्या धुळीतून साकारली आहेत अफलातून चित्रे...जाणून घ्या काय आहे 'डर्टी कार आर्ट' !! – चित्र 2
या पठ्ठ्याने कारच्या धुळीतून साकारली आहेत अफलातून चित्रे...जाणून घ्या काय आहे 'डर्टी कार आर्ट' !! – चित्र 3
या पठ्ठ्याने कारच्या धुळीतून साकारली आहेत अफलातून चित्रे...जाणून घ्या काय आहे 'डर्टी कार आर्ट' !! – चित्र 4
या पठ्ठ्याने कारच्या धुळीतून साकारली आहेत अफलातून चित्रे...जाणून घ्या काय आहे 'डर्टी कार आर्ट' !! – चित्र 5
या पठ्ठ्याने कारच्या धुळीतून साकारली आहेत अफलातून चित्रे...जाणून घ्या काय आहे 'डर्टी कार आर्ट' !! – चित्र 6
या पठ्ठ्याने कारच्या धुळीतून साकारली आहेत अफलातून चित्रे...जाणून घ्या काय आहे 'डर्टी कार आर्ट' !! – चित्र 7
या पठ्ठ्याने कारच्या धुळीतून साकारली आहेत अफलातून चित्रे...जाणून घ्या काय आहे 'डर्टी कार आर्ट' !! – चित्र 8
या पठ्ठ्याने कारच्या धुळीतून साकारली आहेत अफलातून चित्रे...जाणून घ्या काय आहे 'डर्टी कार आर्ट' !! – चित्र 9
या पठ्ठ्याने कारच्या धुळीतून साकारली आहेत अफलातून चित्रे...जाणून घ्या काय आहे 'डर्टी कार आर्ट' !! – चित्र 10
या पठ्ठ्याने कारच्या धुळीतून साकारली आहेत अफलातून चित्रे...जाणून घ्या काय आहे 'डर्टी कार आर्ट' !! – चित्र 11
पुढची गोष्ट
लाइफस्टाइलसाधं आणि गबाळं असणं हेच डी-मार्टचं रूप; हाच २.८ लाख कोटींचा खरा मास्टरस्ट्रोक!डी-मार्टचे साधे आणि अस्ताव्यस्त दिसणारे स्टोअर्स हा ब्रँडचा दोष नसून राधाकिशन दमाणी यांचा अब्जावधींचा मास्टरस्ट्रोक कसा आहे?वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

८६ कोटींचे ३८००० कोटी! कोण आहेत स्टार्टअप दुनियेचे हे 'गॉडफादर'?
लाइफस्टाइल

८६ कोटींचे ३८००० कोटी! कोण आहेत स्टार्टअप दुनियेचे हे 'गॉडफादर'?

ज्या काळात झोमॅटोचं बिझिनेस मॉडेल हसण्यावारी नेण्याचा विषय होता, त्या काळी संजीव बिखचंदानी यांनी ८६ कोटी रुपये गुंतवले. आज त्या गुंतवणुकीचे ३८००० कोटी झाले आहेत. 'स्टार्ट-अप'च्या दुनियेचे गॉडफादर मानल्या जाणाऱ्या संजीव यांचा हा थक्क करणारा प्रवास.

२७ ऑक्टोबर, २०२६

एका 'बायकी' ब्रँडला पुरुषांचा ब्रँड बनवणारा जादूगार: लिओ बर्नेट आणि मार्लबोरोची गोष्ट
लाइफस्टाइल

एका 'बायकी' ब्रँडला पुरुषांचा ब्रँड बनवणारा जादूगार: लिओ बर्नेट आणि मार्लबोरोची गोष्ट

महिलांसाठी सुरू झालेल्या फ्लॉप सिगारेटला एका काउबॉयच्या कल्पनेने पुरुषांचा नंबर वन ब्रँड कसा बनवला, वाचा मार्लबोरोची कथा.

६ जुलै, २०२६