computer

७००० फुटांवरचा चहा....या ठिकाणचा चहा पिण्यासाठी चक्क ट्रेकिंग करावी लागते !!

“चहा पिण्यासाठी मी एकदा मुलगी बघायला गेल्तो” असे जोक्स तुम्ही सोशल मिडीयावर खूप वाचले असतील. चहा लव्हर्स चहासाठी अशा करामती करू पण शकतात. पण आज आम्ही ज्या चॅलेंजबद्दल सांगणार आहोत त्याच्यापुढे हे काहीच नाही.

आम्ही बोलत आहोत जगातील सर्वात उंचावरच्या डेंजर चहा विषयी. हा चहा चक्क ७००० फुटांवर मिळतो. चला तर या ‘डेंजर चहा’विषयी जाणून घेऊया.

चीनचा शिआन प्रांत हा चीनमधला सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. मोठमोठे पॅगोडाज, ऐतिहासिक विषयांवर म्युझिक-डान्स शो, चायनीज फूड आणि जगप्रसिद्ध टेराकोटा आर्मी पण याच जागी आहे.

(टेराकोटा आर्मी)

शिआन प्रांतात हुआशान उर्फ हुवा नावाचा पर्वत आहे. या पर्वतराजीत ताओ पंथाची अनेक मंदिरे आहेत. याच पर्वतराजीच्या दक्षिण भागातल्या शिखरावर एक पुरातन मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारी  एक जुनं चहाचं दुकान आहे.

या चहाच्या दुकानाचं समुद्रसपाटीपासूनची उंची तब्बल ७००० फुट आहे. तसं बघायला गेलं तर शिआन ते हुआशान पर्यंतचं अंतर २ तासात पूर्ण होतं, पण या चहाच्या दुकानापर्यंत पोहोचायला वेगळी कसरत करावी लागते. हे या व्हिडीओमध्ये पाहा.

मंडळी, या ठिकाणी ट्रेकिंगचे सगळे प्रकार आहेत. तुम्ही सुरक्षेसाठी सेफ्टी हार्नेस भाड्याने घेऊ शकता. तरी हा ‘चाय का सफर’ तुम्हाला जन्मभर लक्षात राहील. याचं कारण म्हणजे प्रवासाचा मार्ग. व्हिडीओ मध्ये तुम्ही बघितलंच असेल, की जाण्यायेण्यासाठी एकंच एक मार्ग आहे. दोन्हीकडच्या माणसांना आपापली सुरक्षा करत प्रवास करावा लागतो. हे काहीच नसेल तर त्यांच्या पायांकडे बघा. ज्यावरून ते लोक चालत आहेत ते लाकडी आहे. निसटलो तर थेट वरचा मार्ग धरावा लागेल.

एकंदरीत हा प्रवास तुमचा आणि तिथल्या ७०००० फुट खोल दरीचा आहे. मुख्य प्रश्न असा की वरती मिळणारा चहा मेहनत वसूल करणारा आहे का ? लोकांनी १० पैकी १० मार्क दिलेत राव.

पूर्वीच्याकाळी या ठिकाणी पाणी पोहोचवण्याचं काम माणसांनाच करावं लागायचं. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा युगात हे काम सोप्पं झालंय, पण चहा पिणं अजूनही कठीण आहे.

तर मंडळी, कोण कोण चहा लव्हर या ठिकाणचा चहा पिणार ? तुमच्या मित्रमंडळींना tag करून प्लॅन बनवा !!  

सबस्क्राईब करा

* indicates required