मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

खुद्द सर आयझॅक न्यूटनना शेअर मार्केटमध्ये फटका बसला होता त्याची गोष्ट!!

3 मिनिट वाचन
शेअर करा:
खुद्द सर आयझॅक न्यूटनना शेअर मार्केटमध्ये फटका बसला होता त्याची गोष्ट!!

स्टॉक मार्केट मध्ये चांगला परतावा मिळतो म्हणून अनेकजण यामध्ये पैसे गुंतवतात. काही लोकांना यात खरोखर अफाट फायदा होतो. काही जण रंकाचे राव होतात, तर काहीजण रावाचे रंक! स्टॉकमध्ये नेमका कधी पैसा गुंतवायचा आणि कधी शेअर्स विकायचे याचे अचूक टायमिंग साधता आले की बस्स!
भल्याभल्या लोकांना स्टॉक मार्केटचा चांगलाच फटका बसतो. बुद्धिमत्ता आणि शेअर गुंतवणूक यांचा काही संबध आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा. कारण जगातील सर्वात बुद्धिमान समजला जाणारा व्यक्तीसुद्धा शेअर मार्केटच्या बाबतीत 'ढ' ठरला होता!!

गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारा, गतीचे नियम सांगणारा आणि भौतिकशास्त्राचा संपूर्ण पाया रचणारा व्यक्तीला शेअर मार्केट कळेलच असे नाही. हो इथे आम्ही बोलतोय ते महान शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटनबद्दल. त्यांच्या बुद्धीमत्तेविषयी कुणालाही शंका नसली तरी स्टॉक मार्केट हा प्रांत मात्र त्यांचा नव्हता. असे आम्ही का म्हणतोय ते तुम्हाला पुढील लेख वाचल्यावर कळेलच.

१७२० साली इंग्लंडमध्ये ‘द साऊथ सी’ कंपनीच्या शेअर्सने चांगलीच उचल खाल्ली होती. त्या काळात इंग्लंडमधला हा सर्वात तेजीत असणारा स्टॉक होता. कंपनीला इंग्लंडचे सरकारी कर्ज हाताळण्यास मिळाल्यावर तर या कंपनीच्या शेअर्समध्ये आणखीनच तेजी आली. ही खरीच खूप मोठी गोष्ट होती.

सगळीकडे या कंपनीचा बोलबाला होता. कंपनीच्या शेअर्सना चांगली मागणी होती. हवेचा रोख ओळखत न्यूटन यांनी या कंपनीत गुंतवणूक केली. सरकारी कर्ज हाताळणाऱ्या या कंपनीच्या स्टॉक प्राईसमध्ये अचानक १०% वाढ झाली होती.

खुद्द सर आयझॅक न्यूटनना शेअर मार्केटमध्ये फटका बसला होता त्याची गोष्ट!! – चित्र 1

ही बातमी कळताच न्यूटननी या कंपनीतील आपले शेअर्स विकले आणि त्यातून ७००० युरोज कमावले. पण खरे तर ते आणखी काही काळ थांबले असते तर त्यांना आणखी फायदा मिळाला असता. कारण त्यानंतरही काही काळ तरी त्यांच्या शेअर्सचे भाव वाढतच होते. बरं एकदा शेअर्स विकले ते विकले, मिळाले तितके घेऊन गप्प बसलो असं न करता त्यांनी पुन्हा एकदा चढ्या भावाने शेअर्स खरेदी केले आणि त्यानंतर अचानकच या कंपनीच्या शेअर्सचे भाव गडगडले.
सुरुवातीला जो काही चार पैशांचा फायदा झाला होता, तोही आता बुडाला होता. दुसऱ्या वेळी शेअर्स खरेदी करून न्यूटनने खूप मोठी चूक केली होती. या व्यवहारात त्याला २०,००० युरोंचा तोटा सहन करावा लागला. आजच्या काळात ही रक्कम कोट्यावधी डॉलर्सच्या घरात जाईल.

आजच्या काळातही अनेकजण अशी चूक करतात आणि नंतर पस्तावत बसतात. विज्ञानातील संशोधनाने संपूर्ण जगाला अचंबित करणाऱ्या आयझॅक न्यूटन सारख्या व्यक्तीकडूनही अशी चूक होऊ शकते, यावर विश्वास बसणार नाही पण हे घडलेलं आहे.

प्रत्येकाचं एक वेगळं क्षेत्र असतं, एका क्षेत्रात यशस्वी ठरवलेला व्यक्ती दुसऱ्या क्षेत्रातही यशस्वी होईलच असे नाही. बरोबर ना?

मेघश्री श्रेष्ठी

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलतेजस विमानाचा नेमका काय 'लोचा' झालाय? HAL चे शेअर्स का पडले?तेजस विमानाचे अपघात आणि इंजिन मिळण्यास होणारा विलंब यामुळे HAL चे शेअर्स गडगडले आहेत. या तांत्रिक अडचणींमागील नेमके कारण काय?वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

शेअर एक, फायदे अनेक: गुंतवणुकीवर मिळवा फ्री पिझ्झा आणि हॉटेल ताजमधील स्टे!
लाइफस्टाइल

शेअर एक, फायदे अनेक: गुंतवणुकीवर मिळवा फ्री पिझ्झा आणि हॉटेल ताजमधील स्टे!

केवळ एका शेअरच्या गुंतवणुकीवर कंपन्या कशा पद्धतीने हॉटेल सवलत, फ्री फूड आणि गिफ्ट व्हाउचरचे अनोखे फायदे देतात.

६ ऑगस्ट, २०२६

नशिबाने गवसलेला २७ किलो सोन्याचा गोळा: हँड ऑफ फेथची थरारक गोष्ट
लाइफस्टाइल

नशिबाने गवसलेला २७ किलो सोन्याचा गोळा: हँड ऑफ फेथची थरारक गोष्ट

ऑस्ट्रेलियातील एका सामान्य माणसाला जमिनीखाली सापडलेला २७ किलो सोन्याचा गोळा आणि त्याचे पालटलेले नशीब, वाचा ही रंजक गोष्ट.

९ मे, २०२६