मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

३.९५ कोटी किंमतीचे शेअर्स कर्मचाऱ्यांना भेट देणारे व्ही. वैद्यनाथन कोण आहेत? या मदतीमागचे कारण काय आहे?

3 मिनिट वाचन
शेअर करा:
३.९५ कोटी किंमतीचे शेअर्स कर्मचाऱ्यांना भेट देणारे व्ही. वैद्यनाथन कोण आहेत? या मदतीमागचे कारण काय आहे?

जगात 'सबसे बडा रुपैय्या' यावर नितांत विश्वास असणारे कितीतरी जण आहेत.अगदी गडगंज श्रीमंतांनाही अजून पैसे कमवायचे असतातच. पण आज आम्ही अशा माणसाची कहाणी सांगणार आहोत ज्याने श्रीमंत असूनही अनेकांची मदत केली आहे. IDFC FIRST बँकेचे MD आणि CEO व्ही. वैद्यनाथन हे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. सगळीकडे त्यांचे खूप कौतुक होत आहे .

कारण त्यांनी तब्बल ३.९५ कोटी रुपये किंमतीचे ९ लाख शेअर्स आपल्या घर कामगारांना भेट म्हणून दिले आहेत.

३.९५ कोटी किंमतीचे शेअर्स कर्मचाऱ्यांना भेट देणारे व्ही. वैद्यनाथन कोण आहेत? या मदतीमागचे कारण काय आहे? – चित्र 1

वैद्यनाथन यांचे ट्रेनर रमेश बाबू यांना ३ लाख शेअर्स, हाऊस हेल्पर प्रांजल नार्वेकर आणि ड्रायव्हर एसी यांना २-२ लाख शेअर्स त्यांनी दिले आहेत. मुनापर आणि कार्यालयातील सहाय्यक कर्मचारी दीपक पाथरे आणि हाऊस हेल्पर संतोष जोगळे यांना प्रत्येकी १ लाख शेअर्स दिले आहेत. वैद्यनाथन यांनी ही शेयरची रक्कम या लोकांना घर खरेदी करण्यासाठी दिली आहे. या सर्वांना मोठ्या शहरात स्वतःचे घर घेणे शक्य नाही म्हणून वैद्यनाथन यांनी हा निर्णय घेतला. आणि हे काम त्यांनी प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी केले नसून अशी मदत करण्यामागे त्यांचा संघर्ष दडलेला आहे.

३.९५ कोटी किंमतीचे शेअर्स कर्मचाऱ्यांना भेट देणारे व्ही. वैद्यनाथन कोण आहेत? या मदतीमागचे कारण काय आहे? – चित्र 2

वैद्यनाथन आज एका बँकेचे एमडी आणि सीईओ आहेत, पण सुरुवातीच्या आयुष्यात त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला आहे. वैद्यनाथन हे चेन्नईतील एका सामान्य कुटुंबातून आले आहेत. सरकारी शाळांमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रांची या संस्थेची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. वैद्यनाथन यांना नंतर रांचीला जावे लागणार होते, परंतु त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अशी होती की त्यांच्याकडे रेल्वेचे भाडेही नव्हते. आपल्या शाळेतील एका शिक्षकाकडून ५०० रुपये घेऊन ते रांचीला जाऊ शकले. त्या शिक्षकांनी जी मदत केली त्याचीही परतफेड वैद्यनाथन यांनी केली. ते शिक्षक कुठे आहेत याची माहिती त्यांना नव्हती, पण त्यांनी ते शोधून काढले आणि धन्यवाद म्हणून त्यांना एक लाख शेअर्स भेट दिले. वैद्यनाथन यांनी अनेकवेळा गरजूंना मदत केली आहे. २०१८ मध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि त्यांच्या कामगारांना ४,३०,००० शेअर्स भेट दिले होते.तर रुक्मणी सोशल वेलफेअर ट्रस्टला २ लाख शेअर्स सामाजिक उपक्रमांसाठी दान केले होते.

३.९५ कोटी किंमतीचे शेअर्स कर्मचाऱ्यांना भेट देणारे व्ही. वैद्यनाथन कोण आहेत? या मदतीमागचे कारण काय आहे? – चित्र 3

व्ही. वैद्यनाथन यांच्याकडे ३१ डिसेंबर २१ पर्यंत नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आकडेवारीनुसार IDFC फर्स्ट बँकेचे २.४४ कोटी शेअर्स आहेत. हे शेअर्स बँकेच्या एकूण इक्विटी शेअरहोल्डिंगच्या ०.३९ टक्के आहेत. तर मार्च २०१९ मध्ये त्यांच्याकडे बँकेचे ५.६८ कोटी शेअर्स होते. सध्या कर्मचाऱ्यांना भेट दिलेले ३.९५ कोटी किंमतीचे शेअर्सची किंमत इतकी आहे कारण सोमवारी बीएसईवर बँकेचा शेअर ४३.९० रुपयांवर बंद झाला. अशाप्रकारे ९ लाख शेअर्सची किंमत सुमारे ३.९५ कोटी रुपये काढण्यात आली.

वैद्यनाथन हे एक बुद्धिमान आणि दानशूर आहेतच, पण ते एक चांगले खेळाडू आणि कलाकार देखील आहेत. वैद्यनाथन यांनी आतापर्यंत ८ पूर्ण मॅरेथॉन आणि २२ हाफ मॅरेथॉन धावल्या आहेत. तसेच त्यांना गाण्याचीही आवड आहे. ते गाताना गिटारही चांगली वाजवतात. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या गायकीतूनही गरजूंसाठी निधीही उभारला आहे.

व्ही. वैद्यनाथन यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. त्यांनी आपल्या वागणुकीने एक आदर्श उदाहरणच सर्वांसमोर ठेवले आहे असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही.

शीतल दरंदळे

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

३४ कोटींचा 'ब्लड मनी' आणि २० वर्षांचा वनवास; अब्दुल रहीम अखेर मायदेशी परतला!
लाइफस्टाइल

३४ कोटींचा 'ब्लड मनी' आणि २० वर्षांचा वनवास; अब्दुल रहीम अखेर मायदेशी परतला!

सौदी अरेबियात फाशीची शिक्षा सुनावलेल्या अब्दुल रहीमची ३४ कोटींच्या 'ब्लड मनी'मुळे सुटका झाली. माणुसकीच्या या अभूतपूर्व गोष्टीचा आढावा.

२९ मे, २०२६

विमानातली मासिकं — सीटवर ठेवलेला कागद की कोट्यवधींचा व्यवसाय?
लाइफस्टाइल

विमानातली मासिकं — सीटवर ठेवलेला कागद की कोट्यवधींचा व्यवसाय?

विमानातील सीटच्या खिशात मिळणाऱ्या मासिकांमागे कोट्यवधी रुपयांचे जाहिरात मॉडेल कसे काम करते? जाणून घ्या विमानातील मीडिया बिझनेस.

१० सप्टेंबर, २०२६

१५०० कोटींची 'सेटलमेंट' आणि NSE च्या IPO चा मार्ग मोकळा!
लाइफस्टाइल

१५०० कोटींची 'सेटलमेंट' आणि NSE च्या IPO चा मार्ग मोकळा!

सेबीसोबत १५०० कोटींची सेटलमेंट झाल्यानंतर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) आयपीओचा मार्ग मोकळा झाला, पण सामान्य गुंतवणूकदारांचे काय?

८ सप्टेंबर, २०२६

एका तासात ७.७७ कोटींचा नफा; आशिष कचोलियांची शेअर बाजारातील मोठी खेळी
लाइफस्टाइल

एका तासात ७.७७ कोटींचा नफा; आशिष कचोलियांची शेअर बाजारातील मोठी खेळी

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी आरडी इंडस्ट्रीजच्या आयपीओ लिस्टिंगमधून कोट्यवधींची कमाई कशी केली?

१३ ऑगस्ट, २०२६

एका जिंगलने जिंकलेली कायदेशीर लढाई: 'विको वज्रदंती'चा रंजक प्रवास
लाइफस्टाइल

एका जिंगलने जिंकलेली कायदेशीर लढाई: 'विको वज्रदंती'चा रंजक प्रवास

मुंबईच्या स्वयंपाकघरातून सुरू झालेला ब्रँड आणि औषध की सौंदर्यप्रसाधन या वादात जिंकलेली कायदेशीर लढाई; विकोची यशोगाथा.

११ ऑगस्ट, २०२६

यशाचं 'पंचामृत': या ५ मानसिक वृत्ती तुम्हाला गर्दीतून बाहेर काढतील
लाइफस्टाइल

यशाचं 'पंचामृत': या ५ मानसिक वृत्ती तुम्हाला गर्दीतून बाहेर काढतील

शार्क, ससाणा, रानगवा, कोल्हा आणि मुंगी यांच्या नैसर्गिक वृत्तींतून शिकण्यासारख्या ५ यशाच्या प्रभावी मानसिक पद्धती.

१० ऑगस्ट, २०२६