मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

विमानातली मासिकं — सीटवर ठेवलेला कागद की कोट्यवधींचा व्यवसाय?

3 मिनिट वाचन

विमानातील सीटच्या खिशात मिळणाऱ्या मासिकांमागे कोट्यवधी रुपयांचे जाहिरात मॉडेल कसे काम करते? जाणून घ्या विमानातील मीडिया बिझनेस.

शेअर करा:
विमानातली मासिकं — सीटवर ठेवलेला कागद की कोट्यवधींचा व्यवसाय?

विमानात बसल्यानंतर सीटच्या समोरच्या खिशात तुम्हाला दोन-तीन गोष्टी हमखास दिसतात—सेफ्टी कार्ड, उलटीची पिशवी आणि एक चमकदार मासिक.विमानाने उड्डाण केल्यावर आपण सहज ते मासिक उचलतो.थोडं चाळतो.एखादा प्रवासविषयक लेख वाचतो.एखाद्या हॉटेलची जाहिरात दिसते. एखाद्या घड्याळाची, दागिन्यांची किंवा लक्झरी प्रॉडक्टची जाहिरात दिसते.आणि मग मासिक परत सीटच्या खिशात ठेवून देतो.

आपल्यासाठी हे मासिक म्हणजे थोडासा टाईमपास असतो असं आपल्याला वाटतं पण जाहिरातदारासाठी तुमचा फ्लाईट टाईम फारच मौल्यवान असतो. याच कल्पनेवर उभे आहे एक भन्नाट media business model.त्याचं नाव —Static Media Placement- म्हणजे अशी जागा शोधायची जिथे लोक मोठ्या संख्येने येतात, काही काळ थांबतात आणि समोर ठेवलेली तीच जाहिरात वारंवार पाहतात.

विमान हे त्याचं उत्तम उदाहरण !

IndiGoची fleet आता ४००च्या पुढे गेली आहे. जून २०२६ अखेरीस कंपनीकडे ४३२ विमानं होती.अर्थात सर्व विमानांची seating capacity सारखी नाही; A320, A321 आणि ATR या विमानांमध्ये वेगवेगळ्या क्षमतेच्या जागा आहेत.म्हणजे हजारो उड्डाणांमध्ये दररोज लाखो प्रवासी. आणि त्या प्रवाशांसमोर ठेवलेलं एक मासिक.

आता इथे खरी कमाई कुठे आहे तर ती मासिक विकून नाही. तर जाहिरात विकून.

IndiGoचं Hello 6E हे अधिकृत inflight magazine आहे आणि त्याचे विविध अंक IndiGo स्वतः उपलब्ध करून देते. मासिकाच्या प्रत्येक पानाची एक किंमत आहे. उपलब्ध माहितीनुसार पानभर जाहिरातीची किंमत काही लाख रुपयांच्या आसपास असते तर शेवटच्या पानासाठी किंवा काही मोजक्या पानांसाठी आणखी जास्त ! उपलब्ध माहितीनुसार एक पान जाहिरात ₹३ ते ५ लाख आणि प्रिमियम आणि शेवटच्या पानासाठी ₹६ ते ८ लाख द्यावे लागतात.

म्हणजे एका मासिकात समजा ३०/४० जाहिराती असतील आणि प्रत्येकाची सरासरी किंमत काही लाख रुपये असेल, तर जाहिरातींच्या माध्यमातून सहजपणे कोट्यवधी रुपये जमा होतात.

पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी— हा revenue आहे; profit नाही.

छपाई , डिझाईन, संपादन, फोटो, वितरण, कमिशन आणि इतर खर्च वजा करावे लागतात.

पण business model मात्र अत्यंत आकर्षक आहे.

कारण तुम्ही ‘मासिक’ विकत नाही—तुम्ही ‘attention’ विकता.

आता या बिझीनेसची खरी गंमत समजून घ्या

एका वर्तमानपत्रात जाहिरात दिली तर वाचकाने ते वर्तमानपत्र उघडणे आवश्यक आहे.

मोबाइलवर जाहिरात दाखवली तर त्याने screen पाहणे आवश्यक आहे.

पण विमानात? प्रवासी दोन-तीन तास तुमच्या ecosystemमध्ये आहे.त्याच्याकडे वेळ आहे.आणि समोर मासिक आहे.म्हणून विमानातील जाहिरात ही केवळ print advertising राहत नाही.ती captive-audience advertising बनते.

आता कल्पना करा—विमान सोडून दुसरीकडे हे करता येईल का?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!
लाइफस्टाइल

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!

कच्छचे अज्रख आणि आंध्र प्रदेशचे कलमकारी या दोन्ही पारंपरिक वस्त्रकलांमागे कोणतं प्राचीन रसायनशास्त्र दडलं आहे? वाचा सविस्तर.

१५ ऑक्टोबर, २०२६

बागेतल्या खुर्चीत बसून आकाशात झेप घेणारा लॅरी वॉल्टर्स!
लाइफस्टाइल

बागेतल्या खुर्चीत बसून आकाशात झेप घेणारा लॅरी वॉल्टर्स!

विमान किंवा परवाना नसताना बागेतल्या खुर्चीला ४२ फुगे बांधून १६ हजार फूट आकाशात झेप घेणाऱ्या लॅरी वॉल्टर्सची अजब सत्यकथा.

१३ ऑक्टोबर, २०२६

महेश्वरी साडी — अहिल्याबाईंच्या दूरदृष्टीने विणलेला वारसा!
लाइफस्टाइल

महेश्वरी साडी — अहिल्याबाईंच्या दूरदृष्टीने विणलेला वारसा!

नवरात्रीनिमित्त भारताच्या वस्त्रवैभवाचा वेध: नर्मदा काठच्या महेश्वरमधील ऐतिहासिक महेश्वरी साडी आणि राणी अहिल्याबाईंचे योगदान.

११ ऑक्टोबर, २०२६