मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

Vim: एका डिशवॉशिंग लिक्विडने भारतीय किचन सिंक कसं काबीज केलं?

4 मिनिट वाचन

पारंपरिक राख आणि साबणाऐवजी 'निंबू का पावर' या कल्पक रणनीतीने व्हिमने भारतातील डिशवॉशिंग मार्केटवर कसे राज्य केले?

शेअर करा:
Vim: एका डिशवॉशिंग लिक्विडने भारतीय किचन सिंक कसं काबीज केलं?

Vim: एका डिशवॉशिंग लिक्विडने किचन सिंक कसं काबीज केलं ?'निंबू का पावर' — Vim चा मास्टरस्ट्रोक !

आजच्या भारतीय स्वयंपाकघरात सिंकजवळ ठेवलेली ती पिवळी Vim ची बाटली आपल्याला सहज दिसते. भारताच्या डिशवॉशिंग लिक्विड बाजारपेठेतील ५०% पेक्षा अधिक हिस्सा मिळवणाऱ्या Vim ने फक्त बाजारात आपली जागा बनवली नाही, तर भारतीय घरांमध्ये भांडी घासण्याच्या पद्धतीच बदलून टाकल्या.

बाजार निर्माण करणारा ब्रँड

१९९३ मध्ये Vim भारतात आलं,तेव्हा बहुतेक घरांमध्ये साबण, डिटर्जंट पावडर किंवा राख, वाळू, चिंच पाणी अशा पारंपरिक पद्धती वापरल्या जात होत्या. अशा वेळी Vim ने फक्त आपला प्रॉडक्ट विकण्याचा विचार केला नाही, तर ग्राहकांच्या मनातील “असं वेगळं काही लागेल का?” हीच समजूत मोडली.

Pril आणि Exo सारख्या ब्रँड्सनी बाजारात सुरुवात केली होती. Pril प्रीमियम युरोपियन ब्रँड म्हणून आला आणि लॅब चाचण्यांतून आपल्या शक्तीचा दाखला दिला. मात्र किंमत आणि परकीय प्रतिमा यामुळे तो सामान्य भारतीय ग्राहकांशी जुळून आला नाही.

Exo ने परंपरागत पद्धतींसारख्या स्वच्छतेवर भर दिला आणि आपली एक विशिष्ट ग्राहकवर्गात ओळख निर्माण केली. पण ही मर्यादितच राहिली.यामधून एकही ब्रँड ग्राहकांना वेगळ्या प्रॉडक्टची गरज का आहे, हे पटवून देऊ शकला नव्हता.

१) 'निंबू का पावर' — Vim चा मास्टरस्ट्रोक

Vim ने लिंबूच्या नैसर्गिक शक्तीचा वापर आपल्या ब्रँडची ओळख म्हणून केला. भारतीय घरांमध्ये लिंबाचा वापर भांडी धुण्यासाठी पूर्वीपासूनच होत होता. Vim ने ग्राहकांना रासायनिक फॉर्म्युल्यावर विश्वास ठेवायला सांगितलं नाही — उलट लिंबाच्या नैसर्गिक शक्तीवर विश्वास ठेवायला सांगितला.

त्याचबरोबर पिवळा रंग आणि ताज्या लिंबूसारखा सुगंध देणाऱ्या Vim ने ग्राहकांच्या मनात 'शुद्ध स्वच्छते'चा अनुभव निर्माण केला. स्वच्छतेसाठी फेस येणं आणि जास्त घासणं गरजेचं मानणाऱ्या भारतीयांना Vim च्या समाधानकारक फेसने आणि टेक्सचरने आपल्यात सामावून घेतलं.

२) किराणा दुकानांमध्ये थेट पोहोच

भारतात मोठ्या सूपरमार्केट्सपेक्षा किराणा दुकाने ही खरेदीची प्रमुख जागा आहे, हे लक्षात घेऊन Vim ने या पारंपरिक दुकानांमध्ये स्वतःची जागा निर्माण केली. यामुळे वेगवेगळ्या आर्थिक स्तरांतील ग्राहकांपर्यंत पोहोचणं शक्य झालं.

३)‘पाउच स्ट्रॅटेजी’ — हुशारीची खेळी

भारतीय ग्राहक किंमत-संवेदनशील असतो, हे लक्षात घेऊन Vim ने ₹२० मध्ये लहान पाउच सादर केले. मोठ्या बाटलीवर पैसे खर्च करायला तयार नसलेल्या ग्राहकांना हा परवडणारा पर्याय होता. मासिक पगाराच्या तारखांवर खरेदी केंद्रित असल्यामुळे, कमी किमतीचे पाउच सातत्याने वापर चालू ठेवण्यास मदत करत होते.

फॅमिली पॅक आणि रिफिल पॅकच्या माध्यमातून Vim ने किफायतशीर दर, पर्यावरणपूरकतेचा विचार आणि ब्रँड निष्ठा यांचा सुरेख संगम साधला.

मानसिकतेत बदल आणि जाहिरातींचा प्रवास

४)घरातील स्वच्छता ही केवळ गरज नसून प्रेम, काळजी आणि जबाबदारीचं प्रतीक असते.Vim ने हे ओळखलं की ते फक्त डिशवॉशिंग लिक्विड विकत नव्हते, तर भारतीय घरातली स्वच्छतेची मानसिकता बदलत होते. त्यांनी भांडी घासण्याचं काम सोपं आणि कमी वेळखाऊ करण्यावर भर दिला. विशेषतः शहरी भागात अधिक महिला नोकरदार होत असताना, घरातल्या स्वच्छतेची पातळी कमी न करता वेळ आणि मेहनत वाचवणं हे मोठं बदलतं होतं.

५)Vim च्या जाहिरातींमध्ये घराघरांतील प्रसंग दाखवले गेले, जे सरसकट लोकांशी जुळले. हळूहळू आधुनिक शहरी ग्राहकांना समोर ठेवून Vim ने पारंपरिक लैंगिक भूमिकांच्या पलिकडे जाऊन स्वच्छता ही केवळ बाईंचंच काम नसून सर्वांचं आहे, हेही ठासून सांगितलं. त्यासाठी विशेषतः काळ्या रंगाच्या Vim Men व्हर्जनची ओळख करून, पुरुषांनाही यात सामावून घेतलं.

निष्कर्ष

Vim हा फक्त डिशवॉशिंग लिक्विड ब्रँड नाही, तर भारतीय स्वयंपाकघरातल्या सवयी, मानसिकता आणि बाजारातली स्पर्धा बदलणारा एक यशस्वी बिझनेस मॉडेल आहे. त्यांच्या मार्केटिंगच्या कल्पक पद्धती, ग्राहक समजून घेण्याचा दृष्टिकोन आणि वर्तन बदल घडवणाऱ्या रणनीतीमुळे Vim ने आजचा डिशवॉशिंग लिक्विड मार्केट तयार केलं आणि त्यात आपला अव्वल स्थान टिकवलं.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

साधं आणि गबाळं असणं हेच डी-मार्टचं रूप; हाच २.८ लाख कोटींचा खरा मास्टरस्ट्रोक!
लाइफस्टाइल

साधं आणि गबाळं असणं हेच डी-मार्टचं रूप; हाच २.८ लाख कोटींचा खरा मास्टरस्ट्रोक!

डी-मार्टचे साधे आणि अस्ताव्यस्त दिसणारे स्टोअर्स हा ब्रँडचा दोष नसून राधाकिशन दमाणी यांचा अब्जावधींचा मास्टरस्ट्रोक कसा आहे?

१९ जून, २०२६

शक्तिमानची जादू आणि पार्ले-जीने काबीज केलं तामिळनाडूचं मार्केट!
लाइफस्टाइल

शक्तिमानची जादू आणि पार्ले-जीने काबीज केलं तामिळनाडूचं मार्केट!

९० च्या दशकात तमिळनाडूमध्ये मिल्क बिस्किटांचे वर्चस्व असताना शक्तिमानच्या मदतीने पार्ले-जीने विक्री ५० वरून २ हजार टनांवर कशी नेली?

२२ जून, २०२६

पिवळा डबा आणि वनस्पती तूप: डालडाचा भारतीय घराघरांतील रंजक प्रवास
लाइफस्टाइल

पिवळा डबा आणि वनस्पती तूप: डालडाचा भारतीय घराघरांतील रंजक प्रवास

पामच्या झाडाचा पिवळा डबा आणि हिंदुस्थान लिव्हरच्या मार्केटिंगच्या जोरावर भारतीय स्वयंपाकघरांवर राज्य करणाऱ्या डालडाचा इतिहास.

९ जून, २०२६

तेजसचा नवा अवतार; आता 'स्प्राइट'च्या नावावर धावणार पहिली ब्रँडेड रेल्वे
लाइफस्टाइल

तेजसचा नवा अवतार; आता 'स्प्राइट'च्या नावावर धावणार पहिली ब्रँडेड रेल्वे

आयआरसीटीसीने महसूल वाढवण्यासाठी तेजस एक्सप्रेसच्या ब्रँडिंगचा अनोखा करार कोका-कोला कंपनीशी केला आहे.

१४ ऑगस्ट, २०२६