फक्त ५०० रुपयात जेलची हवा खा...जाणून घ्या काय आहे जेल टुरिझम !!!

जेलमध्ये जाण्यासाठी खून, दरोडा, मारामाऱ्या, चोरी किंवा नाहीच जमलं तर एखाद्यावर शाई फेकणे असले कोणतेही कष्ट घेण्याची आता गरज नाही. फक्त ५०० रुपयांमध्ये तुम्ही जेलमध्ये जाऊ शकता, तिथं राहू शकता, आणि (सुखरूप) परतही येऊ शकता. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन ब्वा?? तर हे आहे ‘जेल टुरिझम’!!

महाराष्ट्रच्या कारागृह प्रशासनानं जेल टुरिझम सुरु करत ठाणे, रत्नागिरी आणि सावंतवाडी हे तीन महत्वाचे तुरुंग यासाठी निवडले आहेत. आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या भागात फिरला असाल, पण आता या अनोख्या उपक्रमात तुम्हाला थेट तुरुंगात जाऊन तिथल्या वातावरणाचा आनंद (?) घेता येणार आहे. तुरुंगात जागा कमी असल्यामुळे तूर्तास पैसे देऊन आलेल्या कैद्यांना (पर्यटकांना) काही तासचं जेलमध्ये थांबता येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

असे असेल तुरुंगातील पर्यटन

1. पर्यटकांना बराकीत ठेवणार.

2. तुरुंगाच्या नियमांचं पालन करावं लागेल.

3. जेवण अॅल्युमिनियमच्या भांड्यात दिलं जाईल.

4. तुरुंगात मिळणारं अन्नच त्यांना देणार आहे.

 

मग तयार आहात का जेलमध्ये जाण्यासाठी ?

सबस्क्राईब करा

* indicates required