नागपूरकरांनो, नागपूर रेल्वे स्थानकाबद्दल या गोष्टी माहित आहेत का ?
मंडळी, आजच्या काळात जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. अशात जर तुम्हाला कोणी सांगितलं की कधीकाळी जमिनी चक्क १ रुपयात विकल्या जायच्या तर तुमचा विश्वास बसेल का ? हे खरच अविश्वसनीय आहे. पण आश्चर्य म्हणजे हे इतिहासात एकदा घडलं आहे. आपल्याच महाराष्ट्रातील विदर्भात हा प्रकार घडला होता. चला जाणून घेऊ हे ठिकाण आहे तरी कुठे !!
इतिहास हा नेहमीच आश्चर्याने भरलेला असतो. आता विदर्भातील या जागेचच बघा ना. अगदी मोक्याची जागा. आजच्या काळात ह्या जमिनीचा भाव काही कोटींमध्ये मोजता येईल एवढा. पण विकत घेतली गेली चक्क एक रुपयात. याच ठिकाणी आज नागपूर रेल्वे स्थानक उभं आहे.
आज नागपूरचं रेल्वे स्थानक जिथे उभं आहे ती जागा खैरागढच्या राजाने इंग्रजांना १ रुपयात विकली होती. पुढे १५ जानेवारी १९२५ रोजी तत्कालीन गव्हर्नर सर फ्रँक यांच्या हस्ते या जागी रेल्वे स्थानक बांधण्यात आले. आज याच जमिनीची किंमत कोट्यावधी रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे. नागपूरचं रेल्वे स्थानक देशातील प्रमुख आणि व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. इंग्रजांनी ज्या जमिनीला १ रुपयात विकत घेतलं त्या जमिनीने त्यांना लाखो रुपये कमावून दिले. आज स्वातंत्र्योत्तर काळात देखील ह्या रेल्वे स्थानकातून कोठ्यावधीचा महसूल सरकार जमा होतोय.
मंडळी, आणखी एक महत्वाची माहिती म्हणजे नागपूर रेल्वे स्थानकाची इमारत सावनेर वरून आणलेल्या ‘बलुआ’ खडकापासून तयार करण्यात आली आहे. ह्या दगडापासून तयार करण्यात आलेल्या इमारती भारतात अगदी दुर्मिळ आहेत. अशाही प्रकारे नागपूर रेल्वे स्थानक खास ठरतं.
राव, तुमच्या ओळखीत कोणी नागपूरकर आहे का ? असेल तर त्याला टॅग करा की भौ !!