computer

व्हिडीओ ऑफ दि डे : मुलाच्या हट्टापाई त्याने बनवली खरोखरची रिक्षा....पाहा हा व्हिडीओ !!

मुलांनी कार, विमान अशा गोष्टींची मागणी केल्याचं आपण बऱ्याचदा बघितलं असेल. अशावेळी त्यांना प्लास्टिकची खेळणी दिली जातात, पण जर मुल आगावुपणाने ‘मला खरी कार हवी’ म्हणत असेल तर त्याला दोन रट्टे देऊन शांत केलं जातं.

केरळच्या अरुण कुमार पुरुषोत्तमन या व्यक्तीकडे त्याच्या मुलांनी चक्क रिक्षाची मागणी केली. मग त्याने काय केलं पाहा.

अरुण कुमारने रिक्षाची प्रतिकृती तयार केली आहे. ही रिक्षा फक्त दिसायलाच हुबेहूब नसून ती खऱ्या रिक्षाप्रमाणे चालवता देखील येते. ही रिक्षा कशी चालते आणि त्याला कशा पद्धतीने बनवण्यात आलं आहे हे आपण व्हिडीओ मध्ये पाहूच शकतो.

अरुण कुमारने या छोट्या रिक्षा मागची गोष्ट सांगितली आहे. त्याचा मुलगा हा १९९० च्या ‘ये ऑटो’ या मल्याळम सिनेमाचा जबरदस्त चाहता आहे. त्याला सिनेमात दाखवली तशीच रिक्षा हवी होती. मग काय अरुण कुमारने मुलाची इच्छा पूर्ण केली. तब्बल ७ महिन्याच्या मेहनतीनंतर तो या कामात यशस्वी झाला आहे. रिक्षाला नावही दिलंय बरं. नाव आहे ‘सुंदरी’. बरोबर ओळखलंत. सिनेमातल्या रिक्षाचं पण हेच नाव आहे.

या प्रकारच्या कामाला DIY (Do it yourself) म्हणतात. अर्थात कोणत्याही तज्ञाच्या मदतीशिवाय केलेलं काम. अरुण कुमारचं हे पाहिलंच काम नाही राव. त्याने या पूर्वी जीप आणि तीन टायरची मोटारसायकल तयार केली होती. रिक्षा प्रमाणेच या दोन्ही गाड्या अस्सल प्रमाणे धावतात राव. हा पहा त्याचा व्हिडीओ.

त्याच्या आधीच्या कामामुळे त्याच्या घरच्यांना आणि त्याच्या युट्युब सबस्क्राइबर्सना या रिक्षाची उत्सुकता होती. त्याने व्हिडीओ तयार तर केला पण एखाद्या साऊथच्या सिनेमाला शोभेल असाच.

अरुण कुमार म्हणतो की त्याला लहानपणी गाड्यांचं वेड होतं. पण आर्थिक कारणाने त्याचं स्वप्न अर्धवट राहिलं. त्यामुळे मग तो स्वतःच गाड्यांच्या प्रतिकृती तयार करू लागला. भविष्यात त्याला अशा आणखी गाड्या तयार करायच्या आहेत आणि तो गाड्यांना विकण्याचाही विचार करतोय.

मंडळी, सांगा बरं अरुण कुमारच्या या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं ?

सबस्क्राईब करा

* indicates required