computer

पाड्व्याला पिकलाय आंबा : भारतातील १३ राज्य आणि आंब्याच्या २२ प्रजाती !!

आपला भारत देश खऱ्या अर्थाने “आम्रभूमी” आहे. भारतात १२०० हून अधिक आंब्याच्या प्रजाती आहेत. या पैकी फक्त २० प्रकारच्या आंब्यांची जोपासना पीक म्हणून केली जाते आणि त्यांचा व्यापार होतो. संपूर्ण जगात आंब्याच्या निर्यातीत भारत अव्वल नंबरवर आहे. आपल्याला सुद्धा आंब्याच्या काही जाती माहित नसतील. आंब्याचा राजा हापूस म्हटला तरी इतर अनेक मानकरी या स्पर्धेत आहेत.

मंडळी गुढीपाडवा येतोय आणि आपल्यातले अनेकजण या दिवसापासून आंबा खायला सुरुवात करतील, पण त्या आधी बघुयात भारतातील प्रत्येक राज्यामध्ये कोणत्या प्रजातीचा आंबा पिकतो ते.

१. आंध्रप्रदेश

बंगनपल्ली (बैंगनपल्ली), सुवर्णरेखा, नीलम आणि तोतापुरी

२. बिहार

बॉम्बे ग्रीन, चौसा, दशेरी, फाझली, गुलाबखास, किशनभोग, हिमसागर, जर्दाळू आणि लंगडा

३. गुजरात

केसर, हापूस, राजापुरी, जमादार, तोतापुरी, नीलम, दशेरी आणि लंगडा

४. हरियाणा

चौसा, दशेरी, फाझली आणि लंगडा

५. हिमाचलप्रदेश

चौसा, दशेरी आणि लंगडा

६. कर्नाटक

हापूस, तोतापुरी, बंगनपल्ली, पायरी, नीलम आणि मुलगोवा

७. मध्यप्रदेश

हापूस, बॉम्बे ग्रीन, दशेरी, फाझली, लंगडा आणि नीलम

८. महाराष्ट्र

हापूस, केसर, पायरी

९. पंजाब

चौसा, दशेरी आणि मालदा

१०. राजस्थान

बॉम्बे ग्रीन, चौसा, दशेरी आणि लंगडा

११. तामिळनाडू

हापूस, तोतापुरी, बंगनपल्ली आणि नीलम

१२. उत्तरप्रदेश

बॉम्बे ग्रीन, चौसा, दशेरी, अन्वर आणि लंगडा

१३. पश्चिम बंगाल

फाझली, गुलाबखास, हिमसागर, किशनभोग, लंगडा आणि बॉम्बे ग्रीन. .

 

तुमचा आवडता आंबा कोणता ? सांगा पटापट !!

सबस्क्राईब करा

* indicates required