मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी दुध विक्रेत्याने काय शक्कल लढवली पाहा !!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी दुध विक्रेत्याने काय शक्कल लढवली पाहा !!

सध्या आपण सगळेच सोशल डिस्टंसिंग म्हणजे अलगीकरणाचं पालन करतोय. पण सर्वच बाबतीत अलगीकरण शक्य नाही. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना आपल्याला इतरांच्या संपर्कात यावं लागतं, पण ते म्हणतात ना आवश्यकता हीच शोधाची जननी आहे. काही लोकांनी या समस्येवर पण भन्नाट  उपाय शोधून काढला आहे. उदाहरणासाठी या दुध विक्रेत्यालाच पाहा ना.

फोटोत दिसणारा दुध विक्रेता पूर्णपणे सुसज्ज दिसतोय. त्याने हातमोजे घातले आहेत, तोंड झाकलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुध देण्यासाठी त्याने चक्क लांबलचक पाईपचा वापर केला आहे. ग्राहक आणि त्याच्यात जास्तीत जास्त अंतर राहील याची त्याने पूर्ण काळजी घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी केरळच्या दुकानदाराने अशीच पद्धत वापरली होती. खरेदी केलेली वस्तू ग्राहकांना देण्यासाठी त्याने दुकानाबाहेर एक जाड पाईप बसवला होता. पाईप जाड असल्याने जवळ जवळ  सर्वच वस्तू ग्राहकाच्या संपर्कात न येता देता येत होत्या. हा फोटो पाहा.

सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी दुध विक्रेत्याने काय शक्कल लढवली पाहा !! – चित्र 1

तुमच्या भागात पण कोणी असा एखादा जुगाड केला असेल तर आम्हला फोटो नक्की पाठवा. पोस्ट आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलआग्र्याचा संगमरवरी ताजमहाल पाहिला असेल, पण काश्मीरमधला हा बर्फाचा ताजमहाल पाह्यलात का?वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

भारतातील या ३ वस्त्रपरंपरांची निर्मिती करण्यासाठी लागतात कित्येक महिने!
लाइफस्टाइल

भारतातील या ३ वस्त्रपरंपरांची निर्मिती करण्यासाठी लागतात कित्येक महिने!

काही साड्या केवळ नेसण्यासाठी नसतात; त्या म्हणजे मानवी कौशल्य, संयम आणि कल्पकतेचा अद्भुत आविष्कार असतात. भारतातील तीन वस्त्रपरंपरा याचीच साक्ष देतात.

२७ ऑक्टोबर, २०२६

एव्हरेस्टच्या शिखरावर १६५ कोटींचा विमा घोटाळा: बेकिंग सोड्याचं 'पांढरं' कारस्थान
लाइफस्टाइल

एव्हरेस्टच्या शिखरावर १६५ कोटींचा विमा घोटाळा: बेकिंग सोड्याचं 'पांढरं' कारस्थान

नेपाळमध्ये गिर्यारोहकांच्या जेवणात बेकिंग सोडा मिसळून त्यांना आजारी पाडलं जायचं आणि विमा कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये उकळले जायचे.

४ एप्रिल, २०२६