computer

२७.५ लाख डॉलर्सना विकला गेलेला जगातला सर्वात महागडा मोबाईल नंबर आहे तरी काय ?

मोबाईल फोन्सचे नंबर, गाडीची नंबर प्लेट यासाठी पसंतीचा, अगदी खास नंबर घेण्याची हौस सर्रास पाहायला मिळते. अनेक नेत्यांचे काही नंबर ठरलेले असतात. तेच त्यांच्या गाडीच्या नंबर प्लेटवर असतात किंवा ते मग मोबाईल नंबरचे शेवटचे आकडे असतात.

हे पसंतीचे नंबर घेण्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात हे सगळ्यांना माहीत आहे. पण असाही एक नंबर आहे जो चक्क लिलाव होऊन विकला गेला आहे. आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा झाली आहे.

.6666666 हा तो फोन नंबर हा नंबर चक्क २७.५ लाख डॉलर्सना किंमतीला विकला गेला आहे. ज्या कंपनीचा हा नंबर आहे त्याचे नाव क्यूटेल असे आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हा नंबर कुणी विकत घेतला हे अजून गुलदस्त्यात आहे. पण या नंबरने गिनीज बुक जागा मात्र मिळवली आहे.

याआधी हा मान चीनमधील एका नंबरला होता. 8888-8888 हा तो नंबर. या नंबरची ४ लाख ८० हजार डॉलर्सला विक्री झाली होती.

क्यूटेल कंपनीची वेगवेगळे अभिनव प्रयोग राबवणारी कंपनी म्हणून ओळख आहे. मोबाईल नंबरचे लिलाव हा देखील त्यातलाच एक प्रकार आहे.

१९५५ पासून दरवर्षी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस् प्रकाशित करण्यात येते. या पुस्तकात नाव येण्यासाठी लोक काय काय करतात हे आम्ही सांगण्याची गरज नाही एवढे हे पुस्तक प्रसिध्द आहे. जगभरातील १०० देशांमध्ये आणि २५ भाषांमध्ये हे पुस्तक प्रकाशित केले जाते.

 

आणखी वाचा :

या नंबरप्लेट्स पाहिल्यात का? चौथ्या नंबरच्या गाडीचा नंबर तुम्ही वाचूच शकणार नाही..

सबस्क्राईब करा

* indicates required