मराठी भाषा दिवस : हे शब्द खास मराठीत तयार केले गेले हे तुम्हांला माहित आहे का ?
मराठी भाषा समृद्ध करण्यात स्वातंत्रवीर सावरकरांनी मोठा हातभार लावला. त्यांनी मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी एक चळवळ उभी केली. मराठी भाषेच्या समृद्धीसाठी त्यांनी नवे शब्द तयार केले, जे आजही आपल्या रोजच्या जीवनात वापरले जातात.
‘स्वकीय शब्द नामशेष करून परकीय शब्द बोकाळू देणं, हे औरस मुलांना मारून दुसरी मुले दत्तक घेण्यासारखे आहे. तो जसा वंशवृद्धीचा मार्ग नव्हे, तसाच हा काही शब्दसंपत्ती वाढवायचा मार्ग नाही.’
या शब्दात त्यांनी स्वकीय भाषेचं महत्व पटवून दिलं. त्यांच्यासोबतच इतिहासाचार्य राजवाडे, कवी माधव ज्युलियन, ज्ञानकोशकार केतकर, राजारामशास्त्री भागवत यांनी देखील आपल्या परीने मराठी भाषेत नवीन शब्दांची भर टाकली. यासाठी त्यांनी आपल्या प्राचीन संस्कृत भाषेचा आधार घेतला.
फारसी, हिंदी, ते अगदी इंग्रजी शब्दांचा मराठीत होऊ लागलेला प्रसार पाहता या महत्वाच्या व्यक्तींनी मराठीत परकीय शब्दांसाठी पर्यायी शब्द सुचवले. या पर्यायी शब्दांना मराठीत आढळ स्थान मिळालं.
आज मराठी भाषा दिनानिमित्त पाहूयात रोजच्या वापरातील असे शब्द जे मराठीत नव्याने तयार केले गेले.
स्वातंत्रवीर सावरकर
दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झामिनर)
शस्त्रसंधी (सिझफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)
राजारामशास्त्री भागवत
राजकारण
(राजकारण हा शब्द आज मोठ्या प्रमाणावर वापरला जात असला तरी काही वर्षांपूर्वी पर्यंत तो वापरात नव्हता. हा शब्द राजारामशास्त्री भागवत यांनी बखरी व रामदासी वाङ्मयातून शोधून नव्याने वापरात आणला.)
ब्राम्हणेतर
न्यायमूर्ती
विश्वविद्यालय