व्हिडीओ ऑफ दि डे : केरळमधील लोक वाहनांपुढे येड्यावानी का नाचत आहेत ? काय आहे हा प्रकार ?

सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या चालेन्जेसने रिकामटेकड्या लोकांना तेवढाच एक टाईमपास मिळतो. किकी चॅलेंजने असाच एक माहोल बनवला होता. आता काही लोकांचे हातपाय तुटले त्याला पर्याय नाही राव. पण किकी चॅलेंजने लोकांना सॉलिड किक दिली. काय असतं ना, हे चालेन्जेस काही काळाने बोर करायला लागतात म्हणून मग नवीन चॅलेंज येतं. असंच एक नवं चॅलेंज चेन्नई मध्ये आलंय राव. बघा बरं काय आहे हे चॅलेंज.

या चॅलेंजचं नाव आहे निल्लू निल्लू. २००४ च्या एका सिनेमात 'निल्लू निल्लू' नावाचं गाणं होतं. या गाण्याचा अर्थ आहे 'थांब थांब’. तर, या शब्दांना जागून काही लोकांनी टिक-टॉक’ या व्हिडीओ ब्रॉडकास्टिंग अॅपवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओ मध्ये काही तरुण एका बाईक समोर जातात आणि नाचू लागतात. बाईकवर असलेला माणूस त्यांचाच मित्र असल्याने तो योग्यवेळी ब्रेक मारतो. पण या व्हिडीओने एक भलताच ट्रेंड सुरु केला आहे.

स्रोत

मंडळी, हा व्हिडीओ ठरवून बनवण्यात आला होता. पण लोकांनी याचा विपरीत अर्थ घेऊन चक्क चालत्या वाहनासमोर उड्या घेतल्या. अजून तरी कोणी या चॅलेंजमुळे जखमी झालेलं नाही. पण वेळीच या चॅलेंजला आळा न घातल्यास किकी सारखा अनुभव येऊ शकतो.

तर मंडळी, तुम्ही असा कोणताही चॅलेंज स्वीकारू नका आणि इतर कोणी स्वीकारू नये यासाठी हा लेख जास्तीत जास्त व्हायरल करा.

 

आणखी वाचा :

हे किकी चालेंज काय आहे भाऊ ? किकी बद्दल सगळी माहिती फक्त एका क्लिकवर !!

चालत्या रेल्वे समोर केला किकी डान्स...बदल्यात अशी शिक्षा मिळाली की तुम्ही विचारही केला नसेल !!

सबस्क्राईब करा

* indicates required