computer

थंड पेयांमध्ये असतात एवढ्या मोठ्या प्रमाणात कीटकनाशके.....हा अहवाल वाचून घाम फुटेल भाऊ !!

उकाडा वाढला की सॉफ्ट ड्रिंक्सचा खप वाढतो. पेप्सी आणि कोका कोला तर प्रसिद्ध आहेच. एखाद बॉटल तुम्ही पण रिचवली असेलच. या संदर्भात नुकताच आलेला अहवाल वाचून पुढच्यावेळी सॉफ्ट ड्रिंक्स घेण्यापूर्वी तुम्ही १० वेळा विचार कराल.

काय आहे या अहवालात ??

Centre for Science and Environment या संस्थेने सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये असलेल्या कीटकनाशकांच्या प्रमाणावर सर्वेक्षण केलं होतं. नुकतंच त्यांच्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

सर्वेक्षणासाठी कोकाकोला आणि पेप्सिको कंपनीच्या ११ वेगवेगळ्या सॉफ्ट ड्रिंक्सचे ५७ नमुने गोळा करण्यात आले होते. हे नमुने देखील १२ राज्यांमधल्या २५ वेगवेगळ्या कारखान्यांमधून जमा करण्यात आले होते. तपासणी केल्यावर असं समजलं की सर्व नमुन्यांमध्ये ३ ते ५ वेगवेगळी कीटकनाशके आहेत. हे प्रमाण भारतीय मानक ब्यूरोने ठरवलेल्या प्रमाणापेक्षा २४ टक्क्यांनी जास्त आहे.

कीटकनाशक जर अन्नात असेल तर आपल्या आरोग्याचे बारा वाजलेच म्हणून समजा आणि इथे तर ते प्रमापेक्षा कैकपटीने जास्त आहे. एवढ्या प्रमाणात तर कॅन्सर सारखा धोका उद्भवू शकतो. अहवालात आणखी काय दिलंय ते पाहूया.

अहवालात नमूद केलेल्या प्रत्येक ठिकाणानुसार बघितलं तर धक्कादायक माहिती मिळते. कोलकाताच्या कोकाकोला कारखान्यातून घेतलेल्या नमुन्यात Lindane नावाचे घातक कीटकनाशक मोठ्याप्रमाणात आढळले आहे. भारतीय मानक ब्यूरोने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा हे प्रमाण १४० टक्क्यांनी जास्त आहे. खुद्द देशाची राजधानी दिल्लीजवळच्या नमुन्यांमध्ये कीटकनाशकांचं प्रमाण ३४ टक्क्यांनी आढळलं तर नैनिताल, गोरखपूर येथे ४२ टक्के आढळलं आहे. हे तर काहीच नाही, ठाण्यातील कोकाकोला कारखान्यातून घेतलेल्या नमुन्यात न्यूरोटोक्सिन, क्लोरपायरिफॉस या रसायनांच प्रमाण २०० टक्क्यांनी जास्त आढळलं आहे.

मंडळी, सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये असलेलं कीटकनाशकाचं प्रमाण फार पूर्वीपासून काळजीचा विषय आहे. यासंदर्भात वेळोवेळी अहवाल देण्यात आले होते. ३ वर्षापूर्वी पण याच प्रकारचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं, पण तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात फारसा फरक आढळलेला नाही असं हा अहवाल म्हणतो.

कीटकनाशक अन्नात असणं हे काही नवीन नाही, पण त्याचं एक प्रमाण नक्कीच असलं पाहिजे. यासंबंधी काही नियम घालून दिले आहेत पण याकडे कंपन्यांनी एकतर दुर्लक्ष केलंय किंवा हे नियम मानण्यास साफ नकार दिला आहे.

मंडळी, आता तुम्हीच सांगा, तुम्ही हे विष पिणार का ??

 

आणखी वाचा :

फळांवर फवारणी केलेले किटकनाशक घालवायचा हा सर्वोत्तम उपाय आहे !!

आपल्या अन्नात कोण विष कालवतंय ?? अमेरिकेत हे आधीच होऊन गेलंय. वाचा ८७०० खटले असलेल्या एका कंपनी बद्दल !

सबस्क्राईब करा

* indicates required