भगतसिंगांचे पिस्तूल तब्बल ९० वर्षांनी सापडले !
इंग्रज सरकारच्या नाकी नऊ आणणार्या शहीद भगतसिंगांनी जॉन सँडर्सला मारण्यासाठी ज्या पिस्तुलाचा वापर केला होता, ती पिस्तुल तब्बल ९० वर्षानंतर सापडली आहे. भगतसिंग यांच्या हातून शेवटची गोळी याच पिस्तुलातून झाडली गेली होती असं म्हणतात. एका अडगळीत सापडलेले हे पिस्तुल भगतसिंग यांचे असल्याचे म्हटले जात आहे. हे ३२ एमएम कोल्ट ऑटोमॅटिक पिस्तुल सध्या इंदोरमधल्या सीमा सुरक्षा दलाच्या फायरिंग रेंजमधल्या प्रदर्शनात ठेवण्यात आलंय.
CSWT म्युझियमचे कस्टोडीयन कमांडंट ‘विजेंद्र सिंग’ यांनी दिलेल्या माहितीनुसार पिस्तुलवरील काळा रंग काढून त्यावरचा सिरीयल नंबर तपासला तेव्हा ही पिस्तुल भगतसिंग यांचीच असल्याचं सिद्ध झालं. भारतीय स्वतंत्र चळवळीतील महत्वाची व्यक्ती म्हणून आपण भगतसिंग यांना ओळखतो. लाल लजपत राय यांच्या निधनाला जबाबदार असल्याबद्दल भगतसिंगांनी १७ डिसेंबर, १९२८ या दिवशी जॉन सँडर्सची हत्या केली होती.