सिंहाचा किल्ला : भाऊ महाराष्ट्रात बनतोय नवा सिंहगड...वाचा पूर्ण माहिती !!

पुणेकर आणि सिंहगड हे एक वेगळं समीकरण आहे राव. मुंबईकरांसाठी सुद्धा तो जवळचा किल्ला आहे. भाऊ ते सोडा, इतिहास घडवणारा हा किल्ला संपूर्ण महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय आहे. पण म्हणूनच सुट्ट्यांच्या दिवशी, पावसाळ्यात अनेकजण सिंहगडची वारी करतात. त्यामुळे ट्राफिक, प्रचंड गर्दी आणि प्रदूषण अशी समस्या उभी राहते. सिंहगड सारख्या ऐतिहासिक वस्तीला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच यावर उपाय म्हणून चक्क आता नवीन सिंहगड उभा राहतोय.

चला तर वाचूया कुठे आहे आपला नवीन सिंहगड.


स्रोत

पुण्याच्या पश्चिमेला असलेल्या धानोरी टेकडीवर ४५० एकरच्या जागेत हा ‘प्रती सिंहगड तयार होणार आहे. ‘पुणे महानगरपालिका’, ‘पर्यावरण पर्यटन विकास मंडळ’, ‘वनविभाग’, आणि ‘जिल्हा नियोजन आणि विकास समिती’ यांनी एकत्र येऊन सिंहगडाच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. पुणे महानगरपालिका तर्फे यासाठी लागणारा १.५ कोटीचा निधी मंजूरही करण्यात आलाय.

धानोरी टेकडीचा भाग हा पडीक असल्याने तिकडे कोणाचं फारसं लक्ष गेलेलं नाही. पण पडीक असला तरी धानोरी जैवविविधता आणि निसर्ग सौंदर्याने वेढलेला आहे. या भागात अतिक्रमण होण्याची शक्यता जास्त असल्याचं दिसून येतं. हे अतिक्रमण रोखण्यासाठी धानोरी टेकडीवर 'इको-टुरिझम' तयार करण्याचा विचार पुणे महानगरपालिका करतंय. यात मुख्य आकर्षण असणार आहे अर्थातच ‘प्रती सिंहगड’. 

मंडळी असे लाख सिंहगड तयार झाले तरी तानाजी मालुसरे यांनी अमर केलेला सिंहगड आपण कधीच विसरणार नाही पण काळाची गरज पाहता पुणे महानगरपालिकेने उचललेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required