मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

रामाची बहीण शांता आणि पावसाचा देव ऋष्यशृंगाची अनोखी कथा

2 मिनिट वाचन

प्रभू श्रीरामाची थोरली बहीण शांता आणि दुष्काळात पाऊस पाडणारे ऋषी ऋष्यशृंग यांची रामायणातील दुर्लक्षित पौराणिक कथा.

शेअर करा:
रामाची बहीण शांता आणि पावसाचा देव ऋष्यशृंगाची अनोखी कथा

प्रभू श्रीरामाला एक मोठी बहीण होती, जिचे नाव 'शांता' होते.रामायणाच्या मुख्य प्रवाहात फारशी न दिसणारी ही व्यक्तिरेखा आजही अनेकांच्या ओळखीची नाही.

गोष्ट सुरू होते अयोध्या आणि अंगदेशाच्या मैत्रीपासून. राजा दशरथ आणि कौसल्या यांची पहिली कन्या म्हणजे शांता. पण, अंगदेशाचे राजा रोमपाद अपत्यहीन होते, म्हणून दशरथाने आपली मुलगी त्यांना दत्तक दिली. शांता अंगदेशाची राजकन्या झाली, पण तिथेच तिच्या आयुष्याचा आणि संपूर्ण राज्याचा सर्वात मोठा 'ट्विस्ट' आला.

अंगदेशात सलग अनेक वर्षे पाऊस पडला नव्हता. शेतं करपली होती आणि लोक पाण्यासाठी तडफडत होते. तेव्हा ऋषींनी राजाला एक उपाय सांगितला की, जर विभांडक ऋषींचा मुलगा ऋष्यशृंग याने राज्यात पाऊल ठेवलं, तरच पाऊस पडेल.

आता खरी गंमत पुढे आहे. हे ऋष्यशृंग ऋषी असे होते ज्यांनी आयुष्यात कधीच कोणती स्त्री पाहिली नव्हती! त्यांचे वडील विभांडक ऋषींनी त्यांना जगापासून पूर्णपणे तोडून एका घनदाट अरण्यात वाढवलं होतं. त्यांना वाटायचं की त्यांचा मुलगा जगाच्या संपर्कात आला तर त्याची मुलाची तपश्चर्या भंग पावेल.

अंगदेश वाचवण्यासाठी एक युक्ती लढवण्यात आली. ऋष्यमित्र ऋषींना जेव्हा मोठ्या शिताफीने पहिल्यांदा नगरात आणलं गेलं, तेव्हा त्यांच्या पवित्र पावलांचा स्पर्श जमिनीला होताच आभाळ फाटून पाऊस कोसळला! हा चमत्कार पाहून राजा रोमपाद सुखावला आणि त्याने आपली मुलगी शांता हिचा विवाह ऋष्यमित्र यांच्याशी लावून दिला.

ऋष्यशृंगाय मुनये विभाण्डक सुताय च

नम: शांताधी पतये वृष्टीकर्ते नमोनम:

आजही कर्नाटकातील शृंगेरी जवळच्या 'किग्गा' मंदिरात असा जप करून ऋष्यशृंग ऋषींची पावसाचा देव म्हणून पूजा केली जाते.

विशेष १३ जून २०२६रोजी म्हणजेच अवघ्या पाच दिवसांपूर्वी, तिथे पावसासाठी 'महारुद्र याग' करण्यात आला. जेव्हा जेव्हा पाऊस ओसरतो किंवा दुष्काळ पडतो, तेव्हा लोक आजही या 'पावसाच्या देवाकडे' धाव घेतात.

तुम्हाला रामाच्या या थोरल्या बहिणीबद्दल आणि तिच्या 'रेनमेकर' पतीबद्दल तुम्हाला आधी माहित होतं का?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

कारखाने, जमीन आणि मशिनरीच्या पलीकडे गेलेली अर्थव्यवस्था!
लाइफस्टाइल

कारखाने, जमीन आणि मशिनरीच्या पलीकडे गेलेली अर्थव्यवस्था!

एनव्हिडीया आणि झोमॅटोच्या मूल्यांकनावरून आज कंपन्यांची खरी ताकद जमिनीवर नसून डेटा, नेटवर्क आणि बौद्धिक संपदेत कशी आहे, याचे विश्लेषण.

५ ऑक्टोबर, २०२६

बागेतल्या खुर्चीत बसून आकाशात झेप घेणारा लॅरी वॉल्टर्स!
लाइफस्टाइल

बागेतल्या खुर्चीत बसून आकाशात झेप घेणारा लॅरी वॉल्टर्स!

विमान किंवा परवाना नसताना बागेतल्या खुर्चीला ४२ फुगे बांधून १६ हजार फूट आकाशात झेप घेणाऱ्या लॅरी वॉल्टर्सची अजब सत्यकथा.

१३ ऑक्टोबर, २०२६

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!
लाइफस्टाइल

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!

कच्छचे अज्रख आणि आंध्र प्रदेशचे कलमकारी या दोन्ही पारंपरिक वस्त्रकलांमागे कोणतं प्राचीन रसायनशास्त्र दडलं आहे? वाचा सविस्तर.

१५ ऑक्टोबर, २०२६