कधी एखाद्या देशाचा पंतप्रधान टिव्हीच्या कॅमेरासमोर रडलेला तुम्ही बघितलाय का? शक्यता कमी आहे पण १९६५ साली एका देशाचा पंतप्रधान खरोखर रडला होता.ही गोष्ट आहे सिंगापूरची !आजचे सिंगापूर बघून या कथेवर विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे.एकेकाळी सिंगापूर मलेशियाचा भाग होता.१९६५ साली अशी काही राजकीय उलथापालथ झाली की मलेशियाने सिंगापूरला मलेशियातून चक्क हाकलून दिले आणि सिंगापूर वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला.
नव्याने जन्माला आलेले सिंगापूर तेव्हा गरीबीच्या खाईत होते.७० टक्के जनता गरीब होती.त्यापैकी बहुतेक लोक अशिक्षित-अडाणी होते. या लोकांना अन्न कसे पुरवायचे ही मोठी समस्या होती.त्यावेळी आंतराष्ट्रीय टिव्ही चॅनेल समोर बोलताना ली क्वान युं #Lee_Kuan_Yew म्हणाले 'मला कळत नाही आता काय करायचे' आणि त्यांना रडू फुटले !
बर्याच देशांकडे नैसर्गिक साधन संपती असते पण सिंगापूरकडे काहीच नव्हते.पण हिंमत हारून काहीच घडणार नव्हते.सिंगापूर #island_country म्हणजे बेट होते.सिंगापूरने चीनकडून येणार्या आणि पाश्चिमात्य देशांकडे जाणार्या जहाजांना #bulk_cargo_Service मोठ्या प्रमाणातील माल इकडून तिकडे हलवण्याची सेवा द्यायला सुरुवात केली.शेल(बर्मा शेल) कंपनीला रिफायनरी सुरु करण्याची विनंती केली.२५००० घरे बांधायला सुरुवात केली ज्यामुळे अशिक्षित लोकांना रोजगार तर मिळालाच आणि सोबत रहायला घरं पण मिळाली.हे सगळं करायचं तर हातात पैसे हवेत पण देशाची तिजोरी तर रिकामी होती.आता करायचं काय ?
सिंगापूर सरकारने विदेशी कंपन्यांना भांडवल आणून उद्योग सुरु करायची विनंती केली.विदेशी कंपन्यांनी सिंगापूरमध्ये यावं म्हणून करात सवलत देणं शक्यच नव्हतं पण त्यातून एक वेगळा प्रस्ताव त्यांनी कंपन्यांसमोर मांडला.'आम्ही तुम्हाला करसवलत देऊ शकत नाही पण 'निश्चित कर' व्यवस्था देऊ'
'निश्चित कर' म्हणजे काय तर जागतिक अर्थव्यवस्थेत सीमापार व्यवसाय आणि आंतरराष्ट्रीय कामगार गतिशीलता ही सामान्य बाब असल्याने, कोणत्या अधिकार क्षेत्रांमध्ये कोणत्या प्रकारच्या उत्पन्नावर कर आकारला जाऊ शकतो यासंबंधी वाद उद्भवतात.कर निश्चितता राखणे आणि वाढवणे करदात्यांना आणि कर प्रशासनाला दोन्ही प्रकारे फायदेशीर ठरते. त्यामुळे आणि गुंतवणूक, नोकऱ्या आणि उद्योगांच्या वाढीला चालना मिळते.या 'निश्चित कर प्रणालीमुळे आजही सिंगापूरमध्ये ९५ टक्के करविषयक खटले सहा महिन्याच्या आता निकाली निघतात.सहा महिन्यात खटला निकाली काढणारा एखादा देश तुम्ही बघितलाय कधी? याच कारणाने बर्याच विदेशी कंपन्यांनी त्यांचं मुख्य कार्यालय सिंगापूरमध्ये ठेवलं.सोबतच उद्योगपतींच्या 'फॅमिली फंड'वर कॅपिटल गेन टॅक्स शून्य टक्के #Zero_Tax निश्चित केला.साहजिकच भांडवलाचा ओघ सिंगापूरच्या दिशेने वाहायला सुरुवात झाली.
पैशाचा प्रश्न निकाली निघाला पण शिक्षणाचं काय ? त्यासाठी नॅनयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी उभी केली.या सातत्याने केलेल्या श्रमाचा फायदा आज सिंगापूरला मिळतोय.ज्या मलेशियाने त्यांना विभक्त करण्याचा निर्णय घेतला त्या मलेशियाचे दरडोई उत्पन्न आज १३००० डॉलर आहे आणि सिंगापूरचे दरडोई उत्पन्न ९०००० डॉलर आहे.हे जर सिंगापूरसारखा देश करू शकतो तर आपण का नाही ?
ही कहाणी आजच्या तारखेस अडचणीत असलेल्या तुमच्या मित्रांना सांगा इतकीच आमची विनंती आहे.






