मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

कारखाने, जमीन आणि मशिनरीच्या पलीकडे गेलेली अर्थव्यवस्था!

3 मिनिट वाचन

एनव्हिडीया आणि झोमॅटोच्या मूल्यांकनावरून आज कंपन्यांची खरी ताकद जमिनीवर नसून डेटा, नेटवर्क आणि बौद्धिक संपदेत कशी आहे, याचे विश्लेषण.

शेअर करा:
कारखाने, जमीन आणि मशिनरीच्या पलीकडे गेलेली अर्थव्यवस्था!

एखाद्या कंपनीची किंमत किती? हा प्रश्न विचारला की अगदी आता आताच्या काळापर्यंत उत्तर फार अवघड नव्हतं. कंपनीकडे किती जमीन आहे, किती कारखाने आहेत, किती मशिनरी आहे, किती माल साठवला आहे, किती कर्ज आहे—हे सगळं तिच्या ताळेबंदात दिसायचं. शेवटी हिशेब मांडला की कंपनीची ‘किंमत’ काढता यायची.
मग अचानक एक दिवस शेअर बाजाराने हा प्रश्नच उलटा केला. Nvidiaकडे किती कारखाने आहेत?
प्रश्न साधा पण उत्तर ऐकलं की जुन्या उद्योगपतींच्या कपाळावर आठ्या पडतील!

कारण Nvidia ही स्वतःच्या नावाने प्रचंड मोठे कारखाने उभारून चिप्स बनवणारी पारंपरिक कंपनी नाही. तिची खरी ताकद आहे—चिप्सची रचना, सॉफ्टवेअर, आर्किटेक्चर, संशोधन, अभियंते आणि AIच्या जगात निर्माण झालेली तांत्रिक आघाडी.
आणि त्याचा परिणाम आकड्यांत दिसतो. Nvidia ने आर्थिक वर्ष २०२६मध्ये तब्बल २१५.९ अब्ज डॉलर महसूल नोंदवला; त्यातील १९३.७ अब्ज डॉलर फक्त Data Centerच्या व्यवसायातून आले.

आता गंमत पाहा.
आपल्या भारतात Zomatoकडे पाहिलं तरी जुन्या अर्थशास्त्राला थोडं चक्कर यावी!
आज Zomato ही स्वतंत्र कंपनीनव्हे, तर Eternal Limited या समूहाचा एक प्रमुख व्यवसाय आहे. Eternalच्या छत्राखाली झोमॅटो-ब्लिंकीट-टडिस्ट्रिक्ट आणि हायपरप्युअर हे व्यवसाय आहेत.

झोमॅटोकडे हजारो एकर जमीन नाही. देशभर स्वतःची रेस्टॉरंट्सची साखळी नाही. पण त्याचं खऱ्या अर्थाने मूल्य कुठे आहे? ते आहे ॲपमध्ये आणि डेटामध्ये.ग्राहकांच्या वस्तू मागवून घेण्याच्या सवयींच्यामाहितीत .रेस्टॉरंट्सच्या नेटवर्कमध्ये.डिलिव्हरी पार्टनर्सच्या नेटवर्कमध्येआणि या सगळ्यांना एका क्षणात जोडणाऱ्या तंत्रज्ञानात.
कंपनीच्या माहितीनुसार आज Zomatoच्या प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला २.७ कोटींपेक्षा जास्त ग्राहक येतात, ३ लाखांपेक्षा जास्त रेस्टॉरंट्सची सेवा घेतली जाते आणि सुमारे ६ लाख delivery partners त्याच्याशी जोडलेले आहेत.
या नेटवर्कची किंमत किती या प्रश्नाचं उत्तर एखाद्या सातबारावर मिळणार नाही!

एटर्नल या मुख्य कंपनीची स्थावरजंगम मालमत्ता सुमारे ₹९६५ कोटीची आहे; पण goodwill ₹५७३७ कोटी आणि अमूर्त मालमत्ता ₹९१२कोटीची आहे.(अमूर्त मालमत्ता पाहता किंवा हाताळता येत नाही, पण ती व्यवसायाला नफा मिळवून देण्यास मदत करते.)

इथेच अर्थशास्त्राचा जुना प्रश्न नव्या रूपात उभा राहतो.
कंपनी म्हणजे नेमकं काय? कारखाना?मशिनरी?जमीन? की काहीतरी वेगळंच?

Googleची खरी ताकद तिच्या ऑफिसच्या इमारतीत नाही; तिच्या सर्च सिस्टममध्ये आहे.

ॲपलची ताकद फक्त कारखान्यांत नाही; तिच्याब्रॅंड- डिझाईन आणि आणि इकोसिस्टममध्ये आहे.

एन्व्हिडिआची ताकद तिच्या इमारतींपेक्षा AI computingमध्ये आहे.

आणि म्हणूनच आजच्या कंपन्यांना फक्त “कंपनीकडे काय आहे?” या प्रश्नाने मोजणं पुरेसं नाही.
एक दुसरा प्रश्न विचारावा लागतो—“ही कंपनी काय करू शकते?”
आणखी महत्त्वाचा प्रश्न— “इतरांना सहज नक्कल करता येणार नाही अशी कोणती क्षमता तिच्याकडे आहे?”
हीच आजच्या अर्थव्यवस्थेची गंमत आहे. पूर्वी कंपनीचा कारखाना पाहून तिची ताकद कळायची.
पण त्याच अदृश्य तंत्रज्ञानाच्या ताकदीवर कंपनी अब्जावधी डॉलरच्या बनतात.
म्हणून उद्याचा गुंतवणूकदार कदाचित ताळेबंद पाहीलच; पण त्याबरोबर आणखी काही पाहील—
ज्ञान किती?प्रतिभा किती?तंत्रज्ञान किती मजबूत? ग्राहक किती जोडलेले? नेटवर्क किती खोल पोहचले आहे?आणि बदलत्या जगात पुन्हा नव्याने उभं राहण्याची क्षमता किती?
या प्रश्नांच्या उत्तरात सगळं काही लपलेलं आहे

आणि म्हणूनच आज कंपनीची खरी किंमत तिच्या गोदामात किती माल पडला आहे यापेक्षा, उद्या ती किती मूल्य निर्माण करू शकते, यात दडलेली आहे.

हीच Nvidiaची गोष्ट आहे. हीच Zomatoची गोष्ट आहे. आणि कदाचित—हीच भविष्यातल्या कंपनीची व्याख्याही आहे.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

ॲरिस्टॉटल आणि फिलीस: एका मध्ययुगीन झारीमागील रंजक आख्यायिका
लाइफस्टाइल

ॲरिस्टॉटल आणि फिलीस: एका मध्ययुगीन झारीमागील रंजक आख्यायिका

मध्ययुगीन काळात हात धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'अ‍ॅक्वामॅनिल' झारीची आणि त्यावर कोरलेल्या ॲरिस्टॉटल-फिलीसच्या कथेची गोष्ट.

१६ ऑक्टोबर, २०२६

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर
विज्ञान

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर

दक्षिण ध्रुवावरील २.५ किमी खोल बर्फात न्यूट्रिनो पकडणारी महाकाय दुर्बीण उभारणारे शास्त्रज्ञ फ्रान्सिस हॅल्झेन आणि त्यांचा नोबेल सन्मान.

७ ऑक्टोबर, २०२६

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!
विज्ञान

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!

प्रकाशाच्या साहाय्याने मेंदूतील पेशींचे नियंत्रण करणाऱ्या 'ऑप्टोजेनेटिक्स' तंत्रज्ञानाचा शोध आणि २०२६ च्या नोबेल पुरस्काराची रंजक गोष्ट.

६ ऑक्टोबर, २०२६

तुमच्या स्वप्नातल्या घराखाली 'विष' तर पेरलेलं नाही? भाग-२
लाइफस्टाइल

तुमच्या स्वप्नातल्या घराखाली 'विष' तर पेरलेलं नाही? भाग-२

ज्या जमिनीवर तुमची टोलेजंग इमारत उभी आहे, तिचा ५० वर्षांचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? जमिनीच्या प्रदूषणाचा वेध घेणारा लेख.

१३ ऑक्टोबर, २०२६