मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

चिप निर्मितीच्या क्षेत्रात 'रुको जरा सब्र करो' म्हणणाऱ्या कंपन्या!

3 मिनिट वाचन

सिलिकॉन वेफरवरील अतिसूक्ष्म त्रुटी शोधून उत्पादनाची गुणवत्ता तपासणाऱ्या KLA सारख्या कंपन्या सेमीकंडक्टर उद्योगात कशा निर्णायक ठरतात?

शेअर करा:
चिप निर्मितीच्या क्षेत्रात 'रुको जरा सब्र करो' म्हणणाऱ्या कंपन्या!

चिप निर्मितीच्या क्षेत्रात 'रुको जरा सब्र करो' असं म्हणणाऱ्या कंपन्या का महत्वाच्या आहेत ?

आता चिपच्या निर्मितीच्या पुढच्या टप्प्याकडे वळू या ! चिप तयार होतेय पण तयार झालेली चिप ओक्के आहे की नाही हे कोण सांगणार?सेमीकंडक्टर बनवण्याच्या या प्रचंड कारखान्यात एक गोष्ट सतत तपासली जाते—आपण जे बनवत आहोत ते बरोबर बनतंय ना?कारण सिलिकॉन वेफरवर प्रत्येक महत्त्वाच्या प्रक्रियेनंतर त्याची तपासणी करावी लागते. अगदी डोळ्यांना दिसणार नाहीत इतके सूक्ष्म दोष शोधण्यासाठी विशेष उपकरणे वापरली जातात.

इथे अमेरिकेची KLA Corporation येते. KLA ही निर्मिती प्रक्रियेच्या क्षेत्रातली आघाडीची कंपनी आहे. २०२५च्या आकडेवारीनुसार निर्मिती प्रक्रियेच्या बाजारातील हिस्सा सुमारे ४९ ते ५८ टक्के या कंपनीकडे आहे. पण खरी गोष्ट आकड्यांपेक्षांही महत्त्वाची आहे.

समजा एखाद्या फॅबमध्ये हजारो वेफर्सवर अनेक दिवस प्रक्रिया सुरू आहे.एखाद्या टप्प्यावर सूक्ष्म दोष निर्माण झाला आणि तो वेळीच सापडला नाही, तर पुढच्या प्रक्रियेत तो दोष शेकडो किंवा हजारो चिप्समध्ये जाऊ शकतो.म्हणजे KLAची भूमिका फक्त “तपासणी करणारी मशीन” विकण्याची नाही; ती उत्पादनाची गुणवत्ता कुठे बिघडते आहे, हे शोधण्याची आहे.आणि यामुळेच चिपच्या वितरणाच्या क्षेत्रात मध्ये तपासणी हा स्वतः एक 'करो या मरो' असा टप्पा असतो.

अमेरिकेने २०२६मध्ये चीनकडून होणाऱ्या सेमीकंडक्टर बनवणाऱ्या मशिनरीच्याच्या निर्यातीवर आणखी निर्बंध घातले. एप्रिल २०२६मध्ये KLAसह काही अमेरिकी कंपन्यांना चीनमधील विशिष्ट उपकरणांची शिपमेंट थांबवण्याचे आदेश देण्यात आल्याच्या बातम्याही आल्या.KLAने स्वतःच्या २०२६च्या अहवालातही चीनसाठी लागू असलेल्या अमेरिकी निर्बंधाचा आपल्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो असे नमूद केले आहे.थोडक्यात सांगायचे तर चिपच्या कारखान्याला गुणवत्ता नियंत्रणाचा भाग आता भू-राजकीय समीकरणाचा भाग झाला आहे.

फोटोमास्क आणि त्यावरचा अदृश्य वॉचमन ! फोटोमास्क म्हणजे चिपवरील सर्कीटची रचना तयार करण्यासाठी वापरले जाणारे एक प्रकारचे अत्यंत सूक्ष्म टेम्प्लेट. पण त्यावर धुळीचा एक कण पडला तरी? तो कण पुढे हजारो चिप्समध्ये दोष निर्माण करू शकतो.म्हणून फोटोमास्कवर एक अतिशय पातळ संरक्षक थर लावला जातो.ज्याला pellicle म्हणतात. Shin-Etsuसारख्या जपानी कंपन्या पेलिकल्च्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतात. पेलिकलच्या बाजारात Shin-Etsu, Mitsui Chemicals आणि FINE SEMITECH यांचा मोठा वाटा आहे.

आता खरी गंमत पुढे आहे. फोटोमास्कमध्ये दोष आहे की नाही, हे तपासणार कोण? इथे पुन्हा जपान समोर येतो—लेझरटेक कार्पोरेशन

लेझरटेकने ने जगातील पहिले स्वयंचलीत फोटोमास्क तपासणीचे तंत्र १९७६मध्ये विकसित केले.ज्या लांबीच्या तरंगाने ने chip pattern तयार केला जातो,त्याच तरंगलांबीच्या प्रकाशात फोटोमास्क तपासला जातो. म्हणून लेझरटेकचेकाम सध्यातरी व्यावसायिकदृष्ट्या अद्वितीय समजले जाते.

आणि याचा अर्थ समजून घ्या.तुमच्याकडे अत्याधुनिक लिथोग्राफी मशिन आहे,तुमच्याकडे फोटोरेझिस्ट आहे.तुमच्याकडे सिलिकॉन वेफर आहे. पण तुमचा maskच दोषपूर्ण असेल आणि तो दोष अचूकपणे शोधता आला नाही, तर पुढची संपूर्ण प्रक्रिया धोक्यात येते.

म्हणून सेमीकंडक्टरच्या जगात कधी कधी सर्वाधिक पैसा कमावणाऱी कंपनी सर्वात महत्त्वाची कंपनी ती नसते.कधी कधी महत्त्वाची असते ती कंपनी जी म्हणते— 'रुको जरा सब्र करो' !!!

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!
विज्ञान

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!

प्रकाशाच्या साहाय्याने मेंदूतील पेशींचे नियंत्रण करणाऱ्या 'ऑप्टोजेनेटिक्स' तंत्रज्ञानाचा शोध आणि २०२६ च्या नोबेल पुरस्काराची रंजक गोष्ट.

६ ऑक्टोबर, २०२६

बागेतल्या खुर्चीत बसून आकाशात झेप घेणारा लॅरी वॉल्टर्स!
लाइफस्टाइल

बागेतल्या खुर्चीत बसून आकाशात झेप घेणारा लॅरी वॉल्टर्स!

विमान किंवा परवाना नसताना बागेतल्या खुर्चीला ४२ फुगे बांधून १६ हजार फूट आकाशात झेप घेणाऱ्या लॅरी वॉल्टर्सची अजब सत्यकथा.

१३ ऑक्टोबर, २०२६