मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

AI चं ढोंग रचून कोट्यवधी लाटले! Builder.ai च्या महाघोटाळ्याची कहाणी

3 मिनिट वाचन

ॲप बनवणाऱ्या AI च्या नावाखाली शेकडो इंजिनिअर्सकडून काम करवून घेणारी Builder.ai कंपनी आणि तिच्या 'AI वॉशिंग' घोटाळ्याची पोलखोल.

शेअर करा:
AI चं ढोंग रचून कोट्यवधी लाटले! Builder.ai च्या महाघोटाळ्याची कहाणी

Builder.ai नावाच्या एका कंपनीची ही स्टोरी आहे. आताचा जमानाच Artificial intelligence (AI) चा असं म्हणत कंटाळून जाऊ नका.कारण ही कंपनी 'नावापुरतीच'(AI) कंपनी आहे. पण नेमकं हेच समजायला गुंतवणूकदारांना इतकी वर्षं लागली की अमेरिकेतल्या नामवंत कंपन्यांनी काही कायदेशिर कारवाई करण्याच्या आतच Builder.ai ने दिवाळखोरी जाहीर केली होती.गुंतवणूकदारांची अवस्था तेलही गेले, तूपही गेली आणि हाती आले धुपाटणे अशी झाली !

Builder.ai काय होते? कल्पना करा, तुम्हाला मोबाइल ॲप बनवायचे आहे, पण तुम्हाला coding येत नाही.
Builder.ai म्हणत होते:“तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय हवे आहे; आमचे AI तुमच्यासाठी ॲप तयार करेल.”
त्यांची AI assistant “Natasha” ग्राहकांच्या गरजा समजून घेईल आणि लगोलग काहीच वेळार ॲपचे software तयार असेलथोड्याच दिवसात ही कंपनी इतकी लोकप्रिय झाली की Microsoft, Qatar Investment Authority आणि इतर मोठ्या गुंतवणूकदारांनी मिळून सुमारे ४५ कोटी डॉलर गुंतवले. बाजाराने कंपनीची किंमत १०० कोटी डॉलरच्या वर गेली.सोबतच कंपनीच्या कारभाराबद्दल संशय निर्माण झाले !

मग गडबड नेमकी कुठे होती?
१. Builder.ai कंपनी असं भासवत होती की कंपनी AI वापरून ॲप तयार करते. पण प्रत्यक्षात भारत आणि इतर देशांतील ७०० इंजिनियरच software develop करत होते-बाहेरून दिसायला AI कंपनी आणि कंपनीच्या आतमध्ये माणसंच काम करत होती
थोडक्यात ही कंपनी धूळफेक करून पैसे जमवत होती. यालाच काही जण “AI washing” म्हणतात
२. थोडा तपास केल्यावर त्याहून गंभीर आरोप समोर आला तो म्हणजे —“Round-tripping” चा गेम वाजवत होती
२०२४ साली मध्ये कंपनी गुंतवणूकदारांना वार्षिक उलाढालीचा अंदाज २२ कोटी डॉलरचा सांगत होती पण प्रत्यक्षात उलाढाल ५ कोटीचीच होती. हा काय प्रकार होता ?
Builder.ai आणि VerSe या कंपन्या “Round-tripping” करत होत्या. राउंड ट्रीपींग म्हणजे काय ते आता समजून घ्या Builder.ai → VerSe कंपनीला एक कोटीचे बिल द्यायची आणि काहीच दिवसात VerSe कंपनी → Builder.ai कंपनीला एक कोटी परत द्यायची. प्रत्यक्षात धंदा काहीच नाही पण कागदावर मात्र मोठमोठे आकडे दिसायचे. थोडक्यात ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात !

पण मग ४५ कोटी डॉलर गेले कुठे ? या प्रश्नाचं उत्तर आजही पोलीस शोधताहेत.२०२५ साली व्हायोला क्रेडीट नावाच्या गुंतवणूकदाराने कंपनीच्या खात्यातल्या उरल्या सुरल्या पैशाचा ताबा घेतला Builder.ai ने दिवाळखोरी जाहीर केली.आणि मग FBI आले! अमेरिकेतील US Attorney's Office ने कंपनीच्या खातेवह्या मागवल्या आणि तपास अजूनही चालूच आहे.

अशा अनेक कंपन्या येतात आणि जातात पण 'बोभाटा' या प्रकरणाचा इतका बोभाटा का करतेय ? हा प्रश्न मनात असेल तर त्याचं उत्तर असं आहे की: ही कंपनी तरुण भारतीयांनी उभी केली होती.सचिन दुग्गल आणि सौरभ धूत हे ते दोन तरूण ! त्यापैकी सौरभ धूत म्हणजे आपल्या भारतात दिवाळखोरी केलेल्या व्हिडीओकॉन कंपनीच्या मालकाचा मुलगा ! हे असले उद्योग करून आपल्या भारत देशाचं नाव जगात डागाळतं हे आपलं मोठं नुकसान आहे ! तुम्हाला काय वाटतं ?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

बागेतल्या खुर्चीत बसून आकाशात झेप घेणारा लॅरी वॉल्टर्स!
लाइफस्टाइल

बागेतल्या खुर्चीत बसून आकाशात झेप घेणारा लॅरी वॉल्टर्स!

विमान किंवा परवाना नसताना बागेतल्या खुर्चीला ४२ फुगे बांधून १६ हजार फूट आकाशात झेप घेणाऱ्या लॅरी वॉल्टर्सची अजब सत्यकथा.

१३ ऑक्टोबर, २०२६

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!
लाइफस्टाइल

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!

माचीसच्या मक्तेदारीच्या जोरावर युरोपमधील सरकारांनाच कर्जाच्या जाळ्यात ओढणाऱ्या स्वीडिश उद्योगपती इव्हार क्रुगरची थक्क करणारी कहाणी.

१४ ऑक्टोबर, २०२६

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!
लाइफस्टाइल

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!

कच्छचे अज्रख आणि आंध्र प्रदेशचे कलमकारी या दोन्ही पारंपरिक वस्त्रकलांमागे कोणतं प्राचीन रसायनशास्त्र दडलं आहे? वाचा सविस्तर.

१५ ऑक्टोबर, २०२६