मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

विमानाचा सुरक्षित प्रवास निश्चित करणाऱ्या 'अदृश्य' शास्त्रज्ञ: डॉ. शुभा अय्यंगार

3 मिनिट वाचन

दाट धुक्यात विमानांचे लँडिंग सुरक्षित करणारे 'दृष्टी' हे स्वदेशी ट्रान्समिसोमीटर विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शुभा व्यंकटेश अय्यंगार.

शेअर करा:
विमानाचा सुरक्षित प्रवास निश्चित करणाऱ्या 'अदृश्य' शास्त्रज्ञ: डॉ. शुभा अय्यंगार

तुमच्या विमानाचा सुरक्षित प्रवास निश्चित करणारी 'अदृश्य' महिला शास्त्रज्ञ: डॉ. शुभा व्यंकटेश अय्यंगार

समजा, विमानतळावर दाट धुक्याचं साम्राज्य पसरलंआहे. रनवेचा एक कोपराही डोळ्यांना दिसत नाहीये.पण कॉकपिटमध्ये बसलेल्या वैमानिकाच्या स्क्रीनवर अचूक माहिती संख्येच्या माध्यमातून चमकते आणि हजारो टन वजनाचं विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरतं.अशा प्रत्येक लँडिंगच्या मागे ४६ वर्षांची तपश्चर्या आणि एका भारतीय महिलेची जिद्द उभी असते.

त्या वैमानिकाला रस्ता दाखवणारी ती 'दृष्टी'डॉ. शुभा व्यंकटेश अय्यंगार यांनी तयार केली होती. नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज (NAL) मध्ये १९७४ साली रुजू झालेल्या या शास्त्रज्ञाने भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे.

२०११ पर्यंत भारताला विमानतळांवरील दृश्यमानता मोजणारी उपकरणं परदेशातून आयात करावी लागत होती. ही यंत्रं प्रचंड महागडी होती आणि त्यांची देखभाल करणं हा एक मोठा आर्थिक भार होता. डॉ. अय्यंगार यांनी आपल्या टीमसह 'दृष्टी' (Drishti) नावाचं स्वदेशी ट्रान्समिसोमीटर विकसित केलं.Transmissometer म्हणजे प्रकाशाला “दूत” बनवून हवा किंवा पाण्याची पारदर्शकता मोजणारे उपकरण.याचा वापर विमानतळांवर धुक्यामुळे दृश्यमानता (visibility) किती आहे हे मोजण्यासाठी केला जातो.आज हेच उपकरण भारताच्या सर्व प्रमुख विमानतळांवर तैनात आहे.

यामागचं कारण केवळ तांत्रिक नाही, तर आर्थिकही आहे. या स्वदेशी तंत्रज्ञानामुळे भारताचे कोट्यवधी रुपये वाचले आहेत.

डॉ. शुभा व्यंकटेश अय्यंगार यांच्या अभ्यासाची कमाल केवळ विमानतळापुरती मर्यादित नाही.भारताच्या अण्वस्त्रवाहू 'अग्नी' क्षेपणास्त्रांमध्ये एकदा एक गंभीर तांत्रिक अडथळा निर्माण झाला होता. क्षेपणास्त्र हे देशाच्या संरक्षणाचे कवच असते, त्यामुळे तिथे चूक व्हायला वाव नव्हता. डॉ. अय्यंगार यांनी या समस्येवर तोडगा काढला आणि अग्नी क्षेपणास्त्राला अधिक अचूक बनवलं.

त्यांच्या नावावर ९० वैज्ञानिक शोधनिबंध आहेत. विशेष म्हणजे,त्यातील तीन शोधनिबंध थेट अमेरिकेच्या 'नासा'ने (NASA) प्रसिद्ध केले आहेत. जागतिक स्तरावर भारतीय बुद्धिमत्तेचा हा डंका त्यांनी शांतपणे वाजवला. तरीही, डॉ. अय्यंगार यांच्याकडे ना इन्स्टाग्राम अकाउंट आहे, ना लिंकडइनवर हजारो फॉलोअर्स.

त्या कोणत्याही स्टार्टअपच्या फाऊंडर नाहीत किंवा अब्जाधीश उद्योजिका नाहीत. त्या फक्त एक कर्तव्यनिष्ठ भारतीय महिला आहेत, ज्यांनी पडद्यामागे राहून देशाला स्वावलंबी बनवलं. त्यांच्या या ४६ वर्षांच्या सेवेची दखल घेत केंद्र सरकारने २०२४ मध्ये त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केलं.

आज जेव्हा तुम्ही धुक्यातून प्रवास करताना विमानाने सुरक्षित लँडिंग करता, तेव्हा लक्षात ठेवा की कुणीतरी 'अदृश्य' महिला शास्त्रज्ञ: तुमच्यासाठी काम करते आहे. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहून देशाची सुरक्षा आणि प्रगती साधणाऱ्या अशा शास्त्रज्ञांना आपण किती ओळखतो?

पुढची गोष्ट
विज्ञाननासाच्या X-59 विमानाची भरारी: आता 'सोनिक बूम'चा त्रास न होता प्रवास शक्यआवाजाच्या वेगापेक्षा वेगाने उडणाऱ्या नासाच्या नव्या X-59 विमानाची यशस्वी चाचणी आणि सोनिक बूमवर केलेली मात.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

'पद्मश्री' नाकारणारा स्वाभिमानी सूर: जेव्हा हेमंत कुमार यांनी सरकारलाच आरसा दाखवला
मनोरंजन

'पद्मश्री' नाकारणारा स्वाभिमानी सूर: जेव्हा हेमंत कुमार यांनी सरकारलाच आरसा दाखवला

आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांनंतर उशिरा दिलेला पद्मश्री पुरस्कार नम्रपणे नाकारून स्वाभिमान जपणारे ज्येष्ठ संगीतकार-गायक हेमंत कुमार.

१६ जून, २०२६

चांद्रयान-३: इस्रोच्या 'विक्रम' लँडरचा डेटा आजही वैज्ञानिकांना चकित करतोय!
विज्ञान

चांद्रयान-३: इस्रोच्या 'विक्रम' लँडरचा डेटा आजही वैज्ञानिकांना चकित करतोय!

चांद्रयान-३ च्या प्रज्ञान रोव्हरने गोळा केलेल्या मातीच्या नमुन्यांचा संबंध अंटार्क्टिकामध्ये सापडलेल्या जुन्या उल्केशी जोडला गेला आहे.

११ जुलै, २०२६

विज्ञानासाठी स्वतःला १२ वेळा फासावर चढवणारा शास्त्रज्ञ: निकोल मिनोव्हिसी
विज्ञान

विज्ञानासाठी स्वतःला १२ वेळा फासावर चढवणारा शास्त्रज्ञ: निकोल मिनोव्हिसी

फाशी दिल्यावर शरीरात नक्की काय बदल होतात हे जाणून घेण्यासाठी स्वतःवरच प्रयोग करणाऱ्या निकोल मिनोव्हिसी या शास्त्रज्ञाची थरारक कथा.

९ मे, २०२६