मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

इंटरनेटवर सर्वांत जास्त वापरलं जाणारं चिन्ह कोणतं? वाचा ही रंजक गोष्ट

3 मिनिट वाचन

इंटरनेटवर सर्वात लोकप्रिय चिन्ह कोणते, यावरून @, #, $, आणि इतर चिन्हांमध्ये रंगलेली एक काल्पनिक आणि रंजक स्पर्धा.

शेअर करा:
इंटरनेटवर सर्वांत जास्त वापरलं जाणारं चिन्ह कोणतं? वाचा ही रंजक गोष्ट

एके दिवशी इंटरनेटवर एक विलक्षण बातमी पसरली—
“इंटरनेटवर सर्वांत जास्त वापरलं जाणारं चिन्ह कोणतं?”
बातमी वाचताच इंटरनेटवरील सर्व चिन्हांची झोप उडाली.
@ ने लगेच आपला कोट चढवला.
“हा पुरस्कार माझाच!” तो आत्मविश्वासाने म्हणाला. “ई-मेल माझ्याशिवाय? अशक्य! सोशल मीडियावर कुणाला टॅग करायचं असेल तरी माझीच आठवण!”
# त्याच्यावर हसला.
“तुझं जग ई-मेल आणि टॅगपुरतं मर्यादित आहे. माझ्यामुळे लोक #Trending, #Viral, #BreakingNews करत जगतात. मी नसतो तर अर्ध्या जगाला आपली मतं व्यक्त करता आली नसती!”
तेवढ्यात $ खाकरला. “तुम्ही दोघे भावनेत जगता. इंटरनेटवर खरं राज्य कुणाचं आहे, माहिती आहे? पैशाचं! आणि पैसा म्हणजे मी!”
% ने त्याला दुरुस्त केलं.
“पैसा असला तरी त्याची टक्केवारी कोण मोजणार? Discount किती? Interest किती? Battery किती? Share किती वाढला? मी नसतो तर लोकांचं अर्धं आयुष्यच अस्पष्ट झालं असतं.”
+ मध्येच उडी मारत म्हणाला, “माझं काय? फोन नंबरमध्ये मी, गणितात मी, जोडण्यात मी. माझ्याशिवाय वाढ कशी होणार?”
= ने चष्मा नीट केला. “वाढ झाली म्हणून काय झालं? शेवटी उत्तर माझ्यामुळेच मिळतं.”
! ने टेबलावर मुठ आपटली. “तुम्ही सगळे खूप शांत आहात! उत्साह, आश्चर्य, संताप—सगळं व्यक्त करायचं असेल तर मी!”

? लगेच म्हणाला,

“पण तू एवढा ओरडतोस का?”

! चिडला.

“कारण मी ! आहे!”

“म्हणजे?”

“म्हणजेच !!”

“पण का?”

“अरे, पुन्हा तू?”

सभा हशाने दणाणून गेली.

तेवढ्यात * उठला.

“माझंही महत्त्व आहे. Footnote, multiplication, password, programming—सगळीकडे माझी गरज असते.”

शेवटी अध्यक्षांनी घोषणा केली— “आता या सभेतील सर्वांत लोकप्रिय चिन्ह निवडण्यात येईल.”

सगळे सरसावले.

@ ने प्रचार सुरू केला.

# ने हॅशटॅग सुरू केला.

$ ने काही संशयास्पद आर्थिक आश्वासनं दिली.

% ने ९९% विजयाचा दावा केला.

! ने घोषणा दिल्या.

= ने आकडे मांडले.

+ ने आघाडी जाहीर केली.

? ने मात्र प्रत्येकाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं.

आणि तेवढ्यात—
सभागृहाच्या शेवटच्या बाकावरून एक मंद आवाज आला. “माझं नाव कुणी घेतलंच नाही.”
सगळे वळून पाहतात.
तिथे एक अगदी साधासुधा, दिसायलाही न येणारा पाहुणा बसला होता ज्याचं नाव होतं -Space.

@ खदखदून हसला. “तू? तुझं काय योगदान?”

# म्हणाला,“तू तर दिसतसुद्धा नाहीस!”

$ म्हणाला,-“तुझी किंमत शून्य!”

Space शांत राहिला. मग तो म्हणाला—

“बरोबर आहे. मी दिसत नाही.”

थोडा थांबून त्याने विचारलं—

“पण माझ्याशिवाय तुमच्यापैकी कोणाचं नाव वाचता येईल?”

सगळे गप्प झाले.

@#, $%, !, *, =,+

सगळे एकमेकांना चिकटून उभे राहिले.कोणालाच अर्थ उरला नाही.

Space हसला.

“मी मोठमोठ्या घोषणा करत नाही. मला कोणी टॅग करत नाही. माझ्यावर हॅशटॅगही चालत नाही. पण दोन शब्दांमध्ये थोडी जागा देतो… आणि अचानक अर्थ तयार होतो.”

सभागृहात शांतता पसरली.

शेवटी अध्यक्षांनी घोषणा केली—

“इंटरनेटचा अदृश्य राजा -SPACE!”

सगळ्या चिन्हांनी टाळ्या वाजवल्या.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

हैदराबाद ते जागतिक महासत्ता: सत्या नाडेला यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त खास वेध
विज्ञान

हैदराबाद ते जागतिक महासत्ता: सत्या नाडेला यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त खास वेध

हैदराबादमधून सुरू झालेला सत्या नाडेला यांचा प्रवास मायक्रोसॉफ्टला यशाच्या शिखरावर पोहोचवणारा आणि तंत्रज्ञानाची नवी दिशा ठरवणारा ठरला.

१९ ऑगस्ट, २०२६

कारखाने, जमीन आणि मशिनरीच्या पलीकडे गेलेली अर्थव्यवस्था!
लाइफस्टाइल

कारखाने, जमीन आणि मशिनरीच्या पलीकडे गेलेली अर्थव्यवस्था!

एनव्हिडीया आणि झोमॅटोच्या मूल्यांकनावरून आज कंपन्यांची खरी ताकद जमिनीवर नसून डेटा, नेटवर्क आणि बौद्धिक संपदेत कशी आहे, याचे विश्लेषण.

५ ऑक्टोबर, २०२६