मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

‘ब्लूटूथ’ नावाच्या मागे एका बारमधली बिअर आहे!

3 मिनिट वाचन

ब्लूटूथ हे नाव कोणत्याही लॅबमध्ये नाही तर एका बारमध्ये बिअर पिताना १०व्या शतकातील व्हायकिंग राजावरून सुचले होते.

शेअर करा:
‘ब्लूटूथ’ नावाच्या मागे एका बारमधली बिअर आहे!

आज मोबाईलचा Bluetooth ऑन केला की जगभरात दोन डिव्हाईसमध्ये शून्य मिनिटात नाते जुळते.पण ‘ब्लूटूथ’ या तंत्रज्ञानाचे नाव एखाद्या अत्याधुनिक प्रयोगशाळेत जन्माला आलेले नाही.

त्यामागे आहे एका बारमधली संध्याकाळ, दोन इंजिनिअर्स, बिअरचे ग्लास आणि एक हजार वर्षांपूर्वीचा Viking राजा!

१९९७मध्ये Intel, Ericsson आणि Nokia आणि काही मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांचे इंजिनिअर कॅनडात -टोरंटोत-एकत्र आले होते. उद्देश होता—कंप्युटर, मोबाईल फोन आणि इतर उपकरणांना कमी अंतरावर वायरलेस पद्धतीने जोडण्यासाठी एकसारखा सॉफ्टवेअर प्रोग्रॅम तयार करणे.सॉफ्टवेअर तयार होतच होते; पण त्याला नाव काय द्यावं मात्र सापडत नव्हते.
एका संध्याकाळी Intelचे इंजिनिअर जिम कार्डॅक आणि Ericssonचे स्वेन मॅटिसन दिवसभराच्या मिटिंगा संपवून लोकल बारमध्ये गेले. कामाच्या चर्चां पासून थोडं दूर गेल्यावर गप्पा इतिहासाकडे वळल्या.
मॅटिसन स्वीडिश असल्यामुळे कार्डॅक यांनी व्हायकिंग बद्दल विचारायला सुरुवात केली.मॅटिसनने कार्डॅकला एक कादंबरी The Long Ships वाचण्याचा सल्ला दिला.
कादंबरी वाचताना कार्डॅक एक कॅरेक्टर सापडलं , ते म्हणजे —Harald Bluetooth नावाचा राजा !

दहाव्या शतकातील या डॅनिश राजाने डेन्मार्क आणि नॉर्वेमधील वेगवेगळ्या गटांना एकछत्री सत्तेखाली आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.हे वाचल्यावर कार्डॅकच्या डोक्यात अचानक एक भन्नाट कल्पना चमकली.
“या Bluetooth नावाचा राजाने अनेक छोट्या छोट्या सत्तांना एकत्र आणलं तसंच काम आपलं तंत्रज्ञानही करणार आहे!”
(आता गंमतीचा भाग असा की Bluetooth हे त्या राजाचं टोपणनाव होतं. दातांना झालेल्या काही रोगामुळे त्याचे दात निळे पडले होते म्हणून त्याला Bluetooth म्हणत.)
पर्सनल कॉम्युटर आणि मोबाइलसारख्या वेगवेगळ्या technology ecosystemsना एकाच wireless standardने जोडायचे होते.
म्हणून प्रकल्पासाठी तात्पुरते नाव ठेवण्यात आले—Bluetooth.

हे नाव कायम ठेवण्याचा सुरुवातीला अजिबात विचार नव्हता. Marketing टीमला त्यापेक्षा अधिक कार्पोरेट आणि आकर्षक नाव हवे होते. RadioWire आणि PAN (Personal Area Network) अशी नावं चर्चेत होती.पण ब्रॅंडिंगच्या जगात कधी कधी technologyपेक्षा ट्रेडमार्क जास्त शक्तिशाली ठरतो!
PAN नाव आधीच trademarkच्या अडचणीत होते आणि RadioWireचे नाव वेळेत legal clearanceमधून बाहेर आले नाही.
आणि मग जे नाव फक्त तात्पुरतं म्हणून ठेवले होते, तेच नाव प्रॉडक्ट लॉन्च करताना ठेवलं गेलं - Bluetooth!

पण कथेला अजून एक सुंदर शेवट आहे.
‘ब्लूटूथ’चा लोगो हा कोणताही आधुनिक डिझाईन नाही.प्राचीन स्कॅंडेनेव्हिअन लिपीतून घेतलेल्या —Hagall, आणि Bjarkan या दोन अक्षरांचं मिश्रण आहेहॅराल्डचा ‘H’(ᚼ)आणि ब्लूटूथचा ‘B’(ᛒ). ही दोन्ही चिन्हे एकमेकांत मिसळली आणि तयार झालं Bluetoothचे चिन्ह.

थोडक्यात. हजार वर्षांपूर्वीच्या व्हायकिंग राजाचं नाव,एका स्विडिश इंजिनिअर आणि एका अमेरिकन इंजिनिअरच्या गप्पा आणि एका बारमधली संध्याकाळ— या सगळ्यांनी मिळून आपल्या मोबाईलच्या Settingsमध्ये कायमचे घर केलं!

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!
विज्ञान

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!

प्रकाशाच्या साहाय्याने मेंदूतील पेशींचे नियंत्रण करणाऱ्या 'ऑप्टोजेनेटिक्स' तंत्रज्ञानाचा शोध आणि २०२६ च्या नोबेल पुरस्काराची रंजक गोष्ट.

६ ऑक्टोबर, २०२६

ॲरिस्टॉटल आणि फिलीस: एका मध्ययुगीन झारीमागील रंजक आख्यायिका
लाइफस्टाइल

ॲरिस्टॉटल आणि फिलीस: एका मध्ययुगीन झारीमागील रंजक आख्यायिका

मध्ययुगीन काळात हात धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'अ‍ॅक्वामॅनिल' झारीची आणि त्यावर कोरलेल्या ॲरिस्टॉटल-फिलीसच्या कथेची गोष्ट.

१६ ऑक्टोबर, २०२६