मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

त्याला डोळ्यांनी दिसत नव्हतं, पण डोळ्यासमोर कंपनीचं भविष्य दिसत होतं!

3 मिनिट वाचन

१९५९ मध्ये दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या बीएमडब्ल्यू कंपनीला हर्बर्ट क्वांट यांनी स्वतःची संपत्ती पणाला लावून कसे सावरले, याची रंजक कथा.

शेअर करा:
त्याला डोळ्यांनी दिसत नव्हतं, पण डोळ्यासमोर कंपनीचं भविष्य दिसत होतं!

कंपनी बुडतेय,कारखाने अर्धे रिकामे आहेत, तिजोरीत पैसे नाहीत आणि बँकरांचा सल्ला स्पष्ट आहे—“कंपनी विकून टाका.”

अशा वेळी कुणी वेगळं काय करणार? पण १९५९ मध्ये एका माणसाने नेमकं उलट केलं.

त्याने संकटात सापडलेली कंपनी विकत घेतली. कंपनी होती जर्मनीची BMW.

आज BMW म्हटलं की आलिशान गाड्या, निळा-पांढरा लोगो आणि किंमत ऐकून आपल्या बँक खात्याला आलेली भोवळ आठवते. पण १९५९ मध्ये परिस्थिती अगदी वेगळी होती. कंपनी आर्थिक संकटात होती, कारखाने पूर्ण क्षमतेने चालत नव्हते आणि बँकर्सच्या मते पुढे पैसा ओतण्यात काही अर्थ नव्हता.

त्यामुळे BMW विकण्याचा निर्णय झाला. आणि संभाव्य खरेदीदार? Mercedes-Benz.

म्हणजे BMW आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्याच्या हातात जाणार होती.

९ डिसेंबर १९५९ रोजी भागधारकांची बैठक झाली. व्यवस्थापन आणि बँकर्सना निर्णय जवळजवळ निश्चित वाटत होता.पण बाहेर कामगार आणि छोटे भागधारक मोठ्या संख्येने जमले होते. त्यांचा संताप होता—“आपली कंपनी प्रतिस्पर्ध्याला का द्यायची?”

बैठकीत मतदान सुरू झालं.एकेक संचालक आपलं मत देत होता.

आणि मग नाव पुकारलं गेलं—

हर्बर्ट क्वांट.....काही क्षण ते शांत राहिले.

समोर बॅलन्स शीट होती . बँकर्सचा सल्ला होता. कंपनीची बिकट अवस्था होती. तरीही त्यांचं उत्तर आलं—

“नाही.”

तो केवळ विक्रीला दिलेला नकार नव्हता. तो त्या वेळच्या सर्वसाधारण निष्कर्षालाच दिलेला नकार होता. आणि मग क्वांट यांनी स्वतःचे पैसे BMW मध्ये गुंतवले.इतरांना ती बुडणारी होडी वाटत होती; त्यांनी मात्र तिच्यात स्वतःची संपत्ती घेऊन प्रवेश केला.

आजच्या काळात एखाद्या शेअरचा भाव दोन टक्के खाली आला तरी आपण चार्ट पुन्हा पुन्हा पाहतो. क्वांट यांनी मात्र संकटात सापडलेल्या संपूर्ण कंपनीवर मोठी पैज लावली.

का?कारण त्यांना तिच्यात संधी दिसत होती. आणि इथे या कथेचा सर्वांत विलक्षण भाग आहे.

हर्बर्ट क्वांट यांची दृष्टी बालपणीच म्हणजे नऊ वर्षांचे असताना गेली होती.ते जवळजवळ अंध झाले होते.

ज्याला जग स्पष्ट दिसत नव्हतं, त्यालाच त्या दिवशी BMWचं भविष्य स्पष्ट दिसत होतं.

बाकीच्यांना दिसत होते—तोटे, रिकामे कारखाने आणि धोका. क्वांट यांना दिसत होती—क्षमता.

पुढे BMW सावरली. तिचं पुनरागमन झालं आणि ती जगातील प्रतिष्ठित मोटार कंपन्यांपैकी एक बनली. क्वांट कुटुंबासाठीही ही गुंतवणूक अफाट यशस्वी ठरली.पण या कथेचा खरा अर्थ BMWच्या यशापेक्षा मोठा आहे.

दृष्टी म्हणजे फक्त डोळ्यांनी दिसणं नव्हे.

संकटाच्या वेळी बहुतेकांना वर्तमान दिसतं; दूरदृष्टी असणाऱ्यांना त्यातून उभं राहणारं भविष्य दिसतं.

म्हणून पुढच्या वेळी सगळे जण एखाद्या गोष्टीबद्दल म्हणत असतील, “हे संपलंय,” तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा—

“खरंच संपलंय, की मला फक्त आजचं दिसतंय?”

कारण कधी कधी, डोळे असणारे लोक परिस्थिती पाहतात;

दूरदृष्टी असलेले लोक शक्यता पाहतात.

हर्बर्ट क्वांट यांना जग कमी दिसत होतं.

पण BMWचं भविष्य—

ते त्यांना स्पष्ट दिसत होतं.

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलजगातील सर्वात 'कुरूप' बूट, ज्याने उभा केला अब्जावधींचा ब्रँड: क्रॉक्सची अजब यशोगाथासुरुवातीला फॅशनचा अपमान ठरवून हिणवल्या गेलेल्या क्रॉक्सने स्वतःच्या बेढबपणालाच ताकद बनवत अब्जावधी डॉलर्सचे साम्राज्य कसे उभे केले?वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

कारखाने, जमीन आणि मशिनरीच्या पलीकडे गेलेली अर्थव्यवस्था!
लाइफस्टाइल

कारखाने, जमीन आणि मशिनरीच्या पलीकडे गेलेली अर्थव्यवस्था!

एनव्हिडीया आणि झोमॅटोच्या मूल्यांकनावरून आज कंपन्यांची खरी ताकद जमिनीवर नसून डेटा, नेटवर्क आणि बौद्धिक संपदेत कशी आहे, याचे विश्लेषण.

५ ऑक्टोबर, २०२६

एका जिंगलने जिंकलेली कायदेशीर लढाई: 'विको वज्रदंती'चा रंजक प्रवास
लाइफस्टाइल

एका जिंगलने जिंकलेली कायदेशीर लढाई: 'विको वज्रदंती'चा रंजक प्रवास

मुंबईच्या स्वयंपाकघरातून सुरू झालेला ब्रँड आणि औषध की सौंदर्यप्रसाधन या वादात जिंकलेली कायदेशीर लढाई; विकोची यशोगाथा.

११ ऑगस्ट, २०२६

गुर्मी आणि माज असलेल्यांचा धंदा कसा बुडतो? अँड्र्यू मेसन आणि ग्रुपॉनची कहाणी!
लाइफस्टाइल

गुर्मी आणि माज असलेल्यांचा धंदा कसा बुडतो? अँड्र्यू मेसन आणि ग्रुपॉनची कहाणी!

गुगलची ६ अब्ज डॉलर्सची ऑफर धुडकावून पुढे अवघ्या तीन वर्षांत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या ग्रुपॉन कंपनीची पडझड.

१३ जुलै, २०२६

कंपनी विकून कामगारांना वाटले २ हजार कोटी: ग्रॅहम वॉकर यांचा अनोखा आदर्श!
लाइफस्टाइल

कंपनी विकून कामगारांना वाटले २ हजार कोटी: ग्रॅहम वॉकर यांचा अनोखा आदर्श!

आपली कंपनी १.७ अब्ज डॉलर्सना विकल्यानंतर ग्रॅहम वॉकर यांनी ५४० कर्मचाऱ्यांना २ हजार कोटी रुपयांचा बोनस वाटून नवा आदर्श ठेवला.

२२ जून, २०२६

फायरबर्ड III: १९५० च्या दशकातील ती कार जी एक अजरामर कलाकृती ठरली!
विज्ञान

फायरबर्ड III: १९५० च्या दशकातील ती कार जी एक अजरामर कलाकृती ठरली!

जनरल मोटर्सने १९५८ मध्ये बनवलेली 'फायरबर्ड ३' ही विमानासारखी दिसणारी आणि जॉयस्टिकने चालणारी आश्चर्यकारक संकल्पना कार.

२१ जून, २०२६