फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका केळ्याची किंमत काय असेल? तुमचे सगळे अंदाज चुकतील पाहा !!

भारतात काय घडेल याचा नेम नाही राव!! नुकताच अभिनेता राहुल बोसला एक वेगळाच अनुभव आला. तर मंडळी झालं असे की, हा भाऊ चंदीगढच्या एका हॉटेलमध्ये थांबला होता. तर त्याने तिथे सकाळी थोडा वर्क आऊट केल्यावर दोन केळी मागवली. रुमसर्व्हिससोबतच बिलही आलं. 

स्रोत

मंडळी, साधारणतः कितीही दर्जेदार केळ असेल तरी त्याची किंमत काय असेल? तुम्ही म्हणाल आमच्याकडे महागातली महाग केळीही पन्नास-शंभर रुपयांना डझनभर मिळतात!! आणि हे खरं पण आहे. केळ हे स्वस्तात मिळणार सर्वात चांगलं फळ आहे. म्हणूनच तर केळी सगळ्या सिझन्समध्ये मिळतात आणि खपतातसुद्धा!! 

तर, राहुल बोसने दोन केळी मागविली होती. पण त्या बिचाऱ्याला वेगळाच अनुभव आला. ऑर्डरनुसार वेटर दोन केळी घेऊन आला, पण सोबत असलेल्या बिलकडे बघून मात्र राहुल बोसच्या चेहऱ्याचा रंगच उडाला.

 

मंडळी, दोन केळ्यांची किंमत होती तब्बल  ४४२रुपये. म्हणजे एक केळ चक्क २२१ रुपयाला पडले राव!! त्या केळ्यांत इतके महाग असण्यासारखे काय होते ते त्या हॉटेलवाल्यांनाच माहित!! मात्र राहुल बोसने लगोलग ट्विटरवर एक व्हिडिओ टाकून ही गोष्ट पूर्ण जगाला सांगितली.  २२१ रुपयांना जर एक केळ मिळत असेल तर महाराष्ट्रातले केळी उत्पादन करणारे शेतकरी काही दिवसांतच करोडपती होतील की राव!! 

स्रोत

ट्विटरवर मात्र लोकांनी त्या हॉटेलला लय ट्रोल करणे सुरू केलंय भाऊ!! काहींनी सांगितले की एवढ्या पैशांत पुण्याचा माणुस मुंबईला जाऊन डझनभर केळं घेऊन येईल. 

व्हिडिओला राहुल बोसने भन्नाट कॅप्शन दिले आहे. 'कोण सांगतो फळं हानिकारक नसतात'. मंडळी फळं खाण्याच्या कारणाने बिचाऱ्या राहुल बोसच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required