तुमच्या नावातील 'जादू' तुम्हीच अनुभवा...
‘कोई मिल गया’ सिनेमात ‘जादू’ म्हणजेच एलियनशी संपर्क साधण्यासाठी कॉम्प्युटर एक म्युझिकल मेसेज पाठवतो. या म्युझिकल ट्यून मध्ये एक कोड फिट केलेला असतो. ज्याला 'साउंड एन्क्रिप्शन' म्हणतात. म्हणजेच ABCD चे रुपांतर म्युझिक मध्ये होते. ते म्युझिक सिग्नलचं काम करतं. हे सिग्नल त्या परग्रहवासींपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्याशी संपर्क होतो.
मंडळी हा झाला सिनेमाचा भाग...पण समजा तुम्हालाही असाच संदेश ‘कोड लॅन्ग्वेज’ मध्ये तयार करता आला तर ? राव, आता हे शक्य आहे ‘Typatone’ या वेबसाईटमुळे. या वेबसाईटवर तुम्ही तुमच्या नावाची, शब्दाची किंवा संपूर्ण वाक्याचं रुपांतर ‘म्युझिकल पीस’ मध्ये करू शकता.. म्हणजे समजा, तुम्ही ‘I Love You’ लिहिलंत तर या शब्दांच रुपांतर एका म्युझिक पीस मध्ये होईल. याची काही उदाहरणं आपण खाली बघूयात.
Typatone कसं काम करतं ?
Typatone तुम्ही लिहिलेल्या शब्दांच संगीत रूप आपल्या समोर ठेवतं. याचाच अर्थ तुमचा एक एक शब्द हा सूर बनतो आणि जेव्हा सगळे शब्द एकत्र येतात तेव्हा एक संगीत तयार होतं.
Typatone मध्ये आणखीही काही प्रकार आहेत ज्याच्यातून आपण वेगवगेळ्या प्रकारचं संगीत तयार करू शकतो. खालील चित्रात दिसणाऱ्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही इतर पर्याय निवडू शकता. त्याचबरोबर बनवलेलं संगीत तुम्ही इतरांना शेअर देखील करू शकता.
शेअर करण्यासाठी खालील ऑप्शन निवडा
आणखी पर्याय निवडण्यासाठी खालील ऑप्शन निवडा
काय मंडळी आहे की नाही भन्नाट....मग आता वाट कसली बघताय, तुम्हीही Typatone ट्राय करा आणि जर जादू सारखा एखादा एलियन आलाच तर सेल्फी काढायला विसरू नका !!