पैजेवर सांगतो हे ठिकाण भारतात आहे यावर तुमचा विश्वासच बसणार नाही...पाहा बरं कुठे आहे हे!!
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/field/image/IMG-20150910-WA0002.jpg?itok=UkcpJYUv)
आपल्या देशात स्वच्छ नदी किंवा समुद्र पाहायला मिळणं तसं दुर्मिळच. कचरा आणि सांडपाण्याने दुषित झालेल्या नद्या आपल्या देशात अनेक पाहायला मिळतील. आपल्या पुण्याच्या मुळा मुठेचंच उदाहरण घ्या ना राव. नदी आहे की गटार असा प्रश्न पडतो. असो...
मंडळी, असं असलं तरी भारतात स्वच्छ नदी पाहायला मिळणारच नाही हा समाज चुकीचा आहे. आज आम्ही तुम्हाला अशा नदीचं दर्शन घडवणार आहोत जी नदी भारतात आहे यावर तुमचा विश्वास बसणार नाही. काचे सारखी स्वच्छ, घाणीचा एक कणही नाही, होडीने जाताना नदीच्या तळाशी होडीची सावली पडेल एवढी पारदर्शी. ही नदी आहे मेघालयची राजधानी शिलॉंग पासून अवघ्या ८५ किलोमीटरवर असलेली ‘उम्नगोट’ नदी.
मेघालयच्या जयंतिया हिल्स जिल्ह्यातील दावाकी या गावातून ‘उम्नगोट’ नदी वाहते. हा भाग भारत बांग्लादेशाच्या सीमेवर आहे. नदीच्या त्या बाजूला गेलं की आपल्याला बांगलादेश सीमा लागते. या भागातून अनेक अवैध कारभार चालतात. नदी आणि तिथला परिसरातून भारतातून बांगलादेशात जाण्यासाठी मार्ग आहे. या मार्गावरून अनेक ट्रक आणि वाहनं ये जा करत असतात.
माणसांची रेलचेल असूनही या नदीला कमालीचं स्वच्छ राखलं गेलं आहे. इथे कोणी अस्वच्छता पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याला दंड ठोठावण्यात येतो. या नदीवर एक झुलता पूल बांधलेला आहे. या पुलावरून नदीचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. बोटीने जाताना नदीच्या तळाशी असलेले मासे सुद्धा तुम्ही पाहू शकता. या नदीला भेट द्यायची सर्वात चांगली वेळ मार्च अणि एप्रिल महिन्यात असते.
मंडळी, ‘उम्नगोट’ नदी भागापासून ३० किलोमीटरवर आशियातील सर्वात स्वच्छ गाव ‘मावल्यान्नॉंग’ वसलेलं आहे. ‘उम्नगोट’ नदी आणि ‘मावल्यान्नॉंग’ गावामुळे भारताची एक वेगळी बाजू बघायला मिळते.
आणखी वाचा :
भारतात आहेत अशी १० जगावेगळी गावं ! कारणं तर जाणून घ्या !!