मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

बिहार मधील या बायका कांगारूची पूजा का करतायत ?

2 मिनिट वाचन
शेअर करा:
बिहार मधील या बायका कांगारूची पूजा का करतायत ?

मंडळी भारतीय लोकांच आणि प्राण्याचं एक अनोखं नातं आहे. आता बघा हा, गाईंची आपण पूजा करतो, उंदीर हे गणपती बाप्पाचं वाहन आहे म्हणून आपण त्याला मानतो, हत्ती म्हणजे गणपती स्वतः बाप्पाच, माकड म्हणजे साक्षात हनुमान, कुत्रा म्हणजे भैरव, कावळा तर खुद्द ज्ञानेश्वरांच्या अभंगात सुद्धा आढळून येतो. पण कांगारूचं काय ? हे बिहार मधले लोक कांगारूची पूजा का करतायत ?

राव अंधश्रद्धा काय असते तर ते हेच. वरील व्हिडीओत बिहार मधील काही स्त्रिया कांगारूची पूजा करताना दिसतायत पण हा कांगारू म्हणजे चक्क कचऱ्याचा डब्बा आहे राव. त्याच्या पोटात असलेल्या जागेत कचरा टाकायचा सोडून या बायका त्याला पाण्याने ‘अभिषेक’ करत आहेत, हळद-कुंकू, फुले वाहत आहेत, पाया पडत आहते. अरे काय चाल्लय काय ? वरील प्रकार बघून या स्त्रियांच्या अज्ञानाची कीव येते राव.

बिहार मध्ये ‘छट पूजे’च्या वेळी हा प्रकार घडला. हा व्हिडीओ ‘अनिल थॉमस’ नावाच्या फेसबुक युझरने अपलोड केल्यानंतर सोशल मिडीयावर या व्हिडीओने धुमाकूळ घालायला सुरुवात केली. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. कदाचित तुम्हालाही व्हॉट्सअपवर आला असेल.

मंडळी आम्हाला काय वाटतंय हा कांगारू लय लकी हाय, कारण असाच कचऱ्याचा डब्बा पेंग्विन, माकडाच्या आकारातसुद्धा असतो पण इथे मान मिळाला थेट ऑस्ट्रेलियाच्या कांगारूला !!

तर मंडळी, यावर तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा. होऊदे चर्चा !!

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलअल्बानियाची 'बर्नेशा' परंपरा: जिथे स्त्री पुरुष म्हणून जगण्याची शपथ घेतेअल्बानियातील 'बर्नेशा' परंपरेत स्त्रिया पुरुष म्हणून जगण्यासाठी जन्मभर कुमारिका राहण्याची शपथ का घेतात? जाणून घ्या या अजब प्रथेबद्दल.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

आधुनिक स्त्रीला बहुतेक सगळे ब्रँड्स अजूनही 'शेजारची काकू' का समजतात?
लाइफस्टाइल

आधुनिक स्त्रीला बहुतेक सगळे ब्रँड्स अजूनही 'शेजारची काकू' का समजतात?

८० टक्के खरेदीचे निर्णय स्त्रिया घेत असतानाही जाहिरातदार आणि ब्रँड्स अजूनही स्त्रियांना दुय्यम ग्राहक का समजतात, यावर परखड भाष्य.

२ जुलै, २०२६

भतेरीच्या धुळीतून जन्मलेला तो कायदा: 'विशाखा' जजमेंट आणि स्त्री-अस्तित्वाचा लढा!
लाइफस्टाइल

भतेरीच्या धुळीतून जन्मलेला तो कायदा: 'विशाखा' जजमेंट आणि स्त्री-अस्तित्वाचा लढा!

राजस्थानच्या भंवरी देवींचा लढा आणि सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक विशाखा मार्गदर्शक तत्त्वे. कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठीचा हा महत्त्वाचा प्रवास.

७ एप्रिल, २०२६