झाशीच्या राणीचा घोडा हवेत उधळलेला, तर शिवाजीमहाराजांच्या घोडयाचा पाय दुमडलेला का असतो?

महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक गावात शिवाजीमहाराजांचा एक पुतळा असतोच असतो. असायलाच हवा, आपलं दैवत आहे ते. पण तुम्ही पाह्यलंय का, महाराजांचा पुतळा हा नेहमी अश्वारुढ असतो आणि त्यातही त्या घोड्याने एक पाय मध्येच दुमडलेला असतो. 

हे पाहा..

स्रोत

त्याउलट झाशीची राणी लक्ष्मीबाई. त्यांचाही पुतळा घोड्यावर बसलेलाच असतो. पण या घोड्याचे पुढचे दोन्ही पाय हवेत असतात. अगदी ' फेकला तटाहूनी घोडा' हे शब्द मूर्तीमंत समोर उभे राहावेत असाच त्यांचा पुतळा असतो. असं का??

याचं उत्तर दडलंय लढाऊ व्यक्तींच्या पुतळे बनवण्याच्या संकेतांमध्ये. 

एखाद्या लढाईत लढतालढता वीरमरण आलेल्या पराक्रमी योद्ध्याच्या पुतळ्याच्या घोड्याचे पुढचे दोन्ही पाय हवेत असावेत असा संकेत आहे.  राणी लक्ष्मीबाईंना असंच वीरमरण आलं. त्यामुळे त्यांचा पुतळ्याचे घोडे नेहमी उधळलेले असतात.

स्रोत

लढताना झालेल्या जखमांमुळे युद्धभूमी सोडून इतरत्र त्या पराक्रमी व्यक्तीचं निधन झालं असेल तर तिच्या पुतळ्याच्या एका घोड्याचा पाय दुमडलेला असतो. शिवराय, महाराणा प्रताप यांचा मृत्यू असाच झाला होता. त्यामुळं या दोघांच्याही पुतळ्याचे घोडे तसे दिसतील.

स्रोत

लढवय्या असूनही त्या व्यक्तीचा मृत्यू लढाई सोडून आजारपणामुळे  किंवा इतर कारणाने  झालेला असेल, तर त्या व्यक्तीच्या घोड्याचे चारही पाय जमिनीला टेकलेले दाखवलेले असतात. 

पहिल्या बाजीरावाचा मृत्यू असाच अचानक ताप भरल्याने झाला होता. त्यामुळे त्यांच्या घोड्याचे चारही पाय जमिनिला टेकलेले हवेत. पण इथं तो संकेत पाळलेला दिसत नाही. तेव्हा ते लढाईसाठी न जाता जहागिरीच्या देखरेखीच्या कामासाठी गेले होते असं सांगण्यात येतं. 

स्रोत

तसे हे संकेत अमेरिका आणि युरोपातून आपल्याकडे आले, पण तरीही साधारणपणे सगळीकडे ते पाळलेले दिसतात. तुमच्या परिसरात असा कुणा पराक्रमी राजा किंवा सरदाराचा पुतळा असेल, तर त्याच्या घोड्याचे खूर उधळलेले अहेत की जमिनीवर आहेत हे पाहा आणि इथं कमेंटबॉक्समधे फोटो शेअर करा..

 

 

आणखी वाचा :

जगातली सर्वात उंच गणपतीची आणि हनुमानाची मूर्ती कुठं आहे ठाऊक आहे? नाही, मग तर नक्कीच वाचा...

आधुनिक शिल्पकलेचे १२ अप्रतिम नमुने!!

५० वर्षं खपून एका मिल कामगारानं या जंगलात काय केलं हे पाहा..

जाणून घ्या ग्रीक संस्कृतीत देवता आणि खेळाडूंचे पुतळे नग्नावस्थेत का असतात !!

जगातला सर्वात उंच पुतळा बनवण्याचा मान जातो या मराठी माणसाकडे.. यांनी आणखी कोणकोणते पुतळे बनवले आहेत माहित आहेत का?

या दोन पुतळ्यांच्या मागे आहे एक करुण प्रेमकहाणी !!

सबस्क्राईब करा

* indicates required