व्हिडिओ- जगातले सगळे शोध मेकॅनिकल इंजिनिअर्सनी लावले असते तर??
चाकाच्या शोधापासून प्राण्यांनी ओढायच्या गाड्यांपासून ते वाफेच्या इंजिनावर चालणार्या पंप आणि रेल्वेपर्यंत बरेच शोध मेकॅनिकल इंजिनिअर्सनी लावले. पण मग एडिसनने वीजेचा शोध लावला आणि दुनियाच बदलली. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्सनी यंत्रांचे आकार लहान करत आणि नवनवी यंत्रे शोधत माणसाला आणखीच आळशी बनवलं. पण जर समजा हे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स जगात नसतेच, आणि सध्या आपण वापरत असलेली सगळी यंत्रं मेकॅनिकल इंजिनिअर्सनी बनवली असती तर?
थांबा. डोक्याला जास्त ताण देऊ नका. फक्त हा व्हिडिओ पाहा आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्सचे आभार माना. डिझेल किंवा पेट्रोलवर चालणारा मायक्रोवेव्ह आणि झेरॉक्स मशीन एकवेळ परवडलं पण जेव्हा लॅपटॉपमध्येही इंधन घालायची वेळ येते खुद्कन हसू येतं. कार चालू केल्यासारखा जर कॉंप्युटर चालू करावा लागला असता तर धमाल आली असती. पण मग वेळेवर कॉंप्युटर चालू झाला असता की नाही शंकाच आहे.
डिझेल किंवा पेट्रोलवर चालणार्या यंत्रातून भकभक बाहेर पडणारा धूर पाहिल्यावर ही सध्याची आपली बिनधुराची यंत्रे बनवल्याबद्दल इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्सचे उपकारच आहेत असं तुम्हाला वाटल्याशिवाय राहणार नाही.