भारताकडून पाकिस्तानकडे चुकून सुटलेल्या मिसाईलचं प्रकरण नेमकं काय आहे?

भारत आणि पाकिस्तान सबंध जबरदस्त तणावाचे असतात. मग तो खेळ असो वा युद्ध!!  छोट्या गोष्टीवरुन देखील इथं मोठी समस्या उभी राहू शकते. मात्र काल देशभर पाच राज्यांच्या निकालाची चर्चा सुरू असताना भारतातलं एक मिसाईल थेट पाकिस्तानात घुसलं. पाकिस्तानी लष्कर आणि इतर महत्वाच्या अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली.

पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या मिसाईल घुसल्यावरून १०० अंदाज काढले असतील. आपलाही युक्रेन होतो की काय अशी शंका पण त्यांना येऊन गेली असेल. पण मात्र आता भारत सरकारने याबद्दल सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. टेक्निकल समस्येमुळे हे मिसाईल चुकून पाकिस्तानकडे सुटले असे भारताने म्हटले आहे.

९ मार्च रोजी रुटीन मेंटनन्सची कामे सुरू असताना, चुकून एक मिसाईल पाकिस्तानकडे लोड झाले होते. मिसाईल जाऊन पडले थेट पाकिस्तानातील खानावल जिल्ह्यात. या घटनेत कुठली जिवितहानी झाली नसली तरी पाकिस्तानात मात्र यामुळे चांगलाच हल्लकल्लोळ माजला आहे. सुरुवातीला तर तेथील मीडियाने याला भारताचे पाकिस्तानवर आक्रमण असेच रूप देऊन टाकले होते. तशा बातम्याही येत होत्या. 

भारताकडुन मात्र ही घटना चुकून घडली असल्याचे सांगण्यात आले असून यासाठी कोर्ट ऑफ इन्कवायरीचे आदेश देण्यात आले आहेत. भारताचे हे ब्राम्होस सुपरसॉनिक मिसाईल पाकिस्तानी सीमेच्या तब्बल १२४ किलोमीटर आत जाऊन पडले आहे. हे मिसाईल पाकिस्तानी एयर डिफेन्स सिस्टीमकडून ट्रेस करण्यात आले होते. 

मिसाईल जिथे पडले त्याच्या फक्त १०० मीटर थोड्या साईडला जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचे घर आहे असे म्हटले जात आहे. साहजिक पाकिस्तानची या घटनेने चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे.

 

सबस्क्राईब करा

* indicates required