computer

अ‍ॅटर्नी जनरल के के वेणूगोपाल यांनी विद्यार्थ्यांना तब्बल १२ लाख रुपयांची ५४ खंडांची पुस्तके भेट दिली.

कायद्याची पुस्तके ही जाडजूड असतात हे ज्यांनी वकिलीचा  अभ्यास केला किंवा ज्यांचा वकिलांशी संबंध आला असेल, त्यांना नक्कीच माहीत असेल. कायदेशीर बाबींवर प्रभुत्व असायला हवे तर या जाडजूड पुस्तकांचा अभ्यास करणे भाग आहे. आता या जाडजूड पुस्तकांची किंमत पण काय कमी जाडजूड नसते. 

जास्त म्हटले तरी शेवटी पुस्तकाची किंमत होऊन होऊन किती जास्त असेल हा विचार कोणीही करू शकतो. एक पुस्तक मात्र तब्बल १२ लाख रुपये किमतीचे आहे, ज्यावरून ते चांगलेच चर्चेत आले आहे. 

 

केरळ विद्यापीठातील कायदा विभागातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी देशाचे अ‍ॅटर्नी जनरल के के वेणूगोपाल यांची या मदत या पुस्तकासाठी मागितली. चिसम ऑन पेटंट्स असे त्या पुस्तकाचे नाव असून हे पुस्तक कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचे असे संदर्भग्रंथ समजले जाते. ५४ खंडांच्या या पुस्तकाची एकूण किंमत ह तब्बल १२ लाख रुपये इतकी आहे. 

आता त्या लायब्ररीला वार्षिक ४ लाख अनुदान नवे पुस्तके घेण्यासाठी मिळते तिथे १२ लाख रुपयांचे पुस्तक घेणे शक्य नव्हते. पण एकेदिवशी अचानक या डिपार्टमेंटचे प्रमुख सिंधु थुलासिधरन यांना एक पत्र मिळाले. हे पत्र खुद्द वेणूगोपाल यांचे होते. त्यांनी आपण हे पुस्तक स्वतः विकत घेऊन या विद्यार्थ्यांना गिफ्ट देणार असल्याचे सांगीतले. विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही अटर्नी जनरल यांच्या या कृतीने आनंदी झाले आहेत.

चिसम ऑन पेटंट्स हे पुस्तक १९७८ डोनाल्ड एस चिसम यांनी लिहून साली प्रकाशित केले होते. तेव्हापासून आजवर हे पुस्तक कायद्याच्या अभ्यासकांसाठी महत्वाचे पुस्तक आहे. यात ११७० अमेरिकन केसेसची माहिती आहे. १४ अमेरिकन सुप्रीम कोर्टाने दिलेले निकाल यात सविस्तर मांडण्यात आले आहेत. 

पेटंट क्लेम राखण्यासाठी या पुस्तकात अतिशय सुटसुटीत आणि महत्वाच्या गोष्टी असल्याने या पुस्तकाचे इतके महत्व आहे. केके वेणूगोपाल यांना आपले वडील एमके नांबीयार यांच्या स्मरणार्थ कायदा विद्यापीठ काढण्याचे स्वप्न होते पण ते साकार होऊ शकले नाही तर बंगलोर येथील नॅशनल युनिव्हर्सिटी लॉ स्कुल येथे त्यांच्या नावाने एमके नांबीयार चेयर ऑफ कॉन्स्टिट्युशनल लॉ स्थापन करण्यात आले. 

या व्यतिरिक्त देखील वेणूगोपाल हे वरीलप्रमाणे मदत कायद्याचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना करत असतात.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required