व्हिडीओ ऑफ दि डे : चक्क एका ग्रहाच्या जन्माचे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे? व्हिडीओ पाहा !!
अवकाश म्हटले म्हणजे अनेक रहस्यांनी आणि न उलगडगेल्या कोड्यांनी भरलेले आहे. सतत नवनवीन घडामोडी घडत असतात. त्यातल्या काही आपल्यापर्यंत पोहोचतात तर कित्येक माहितीही होत नाहीत. हळूहळू विश्वाचे गुढ उलगडट आहे. मागच्या वर्षी ब्लॅक होलचे अधिकृत छायाचित्र मिळविण्यात शास्त्रज्ञांना यश आले होते. तर आता चक्क एका ग्रहाच्या जन्माचे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. आजवर कधीही न घडलेली अशी ही घटना आहे.
युरोपियन साऊथर्न ऑब्झर्वेट्रीच्या प्रचंड मोठ्या अशा टेलिस्कोपच्या साहाय्याने हे दृश्य टिपण्यात आले आहे. AB ऑरीग नावाच्या ताऱ्याभोवती हा ग्रह स्थिरावला आहे. पृथ्वीपासून तब्बल 520 प्रकाशवर्ष एवढे अंतर या ग्रहाचे आहे.
(युरोपियन साऊथर्न ऑब्झर्वेट्री)
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार आजवर अनेक ग्रहांचा शोध लागला आहे. पण या ग्रहांचा जन्म कसा होतो याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. हा क्षण कैद करण्यासाठी शास्त्रज्ञांच्या टीमला अत्यंत बारीक निरीक्षण करावे लागले आहे.
शास्त्रज्ञांना माहीत होते की नविन ग्रहाचा जन्म हा धुळसर डिस्कमध्ये नव्या ताऱ्यांभोवती होतो. पण या शोधामुळे अवकाश तंत्रज्ञानामध्ये अचूकता येण्यासाठी अधिक मदत होणार आहे.
लेखक : उदय पाटील