मेस्सीच्या निवृत्तीनंतर हे ५ खेळाडू होऊ शकतात भविष्यातील स्टार फुटबॉलपटू...
फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू म्हणून ओळखले जाणारे लिओनेल मेस्सी आणि क्रिस्तीसानो रोनाल्डो आता आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या टप्प्यात आहेत. अशी शक्यता वर्तवली जात आहे की, कतारमध्ये होणारी फिफा विश्वचषक स्पर्धा ही या दोन्ही दिग्गज खेळाडूंच्या कारकिर्दीतील शेवटची मोठी स्पर्धा ठरू शकते. लिओनेल मेस्सीने संकेत दिले आहेत की, कतारची ही स्पर्धा त्याच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल.
लिओनेल मेस्सी आणि क्रिस्तीसानो रोनाल्डो या दोन्ही खेळाडूंना तोड नाहीये. फुटबॉल स्पर्धेतील इतिहासात या दोन्ही खेळाडूंनी जे काही करून दाखवलं आहे, त्याच्या जवळपासही कोणी जाऊ शकत नाही. मात्र काही खेळाडू असे देखील आहेत, जे येणाऱ्या काही वर्षांत फुटबॉल विश्वात नवी क्रांती घडवू शकतात. चला तर नजरा टाकुया अशा काही खेळाडूंवर जे सध्या फुटबॉलच्या मैदानावर जोरदार कामगिरी करत आहेत.
१) कायलियन एमबाप्पे (Kylian Mbappe)
फ्रान्सचा २३ वर्षीय फुटबॉलपटू कायलियन एमबाप्पे सध्या फुटबॉलच्या मैदानावर जोरदार कामगिरी करतोय. एक खेळाडू म्हणून त्याने कमी वयात अनेक पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. पीएसजी संघासाठी खेळणारा कायलियन एमबाप्पे हा विश्वचषक स्पर्धेत सर्वात कमी वयात गोल करणारा फ्रान्सचा पहिला फुटबॉलपटू आहे. २०१८ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात एमबाप्पेने गोल करत पेलेची बरोबरी केली होती.
२) फिल फोडेन (Phil foden )
२२ वर्षीय फिल फोडेनने आपल्या वयाच्या इतर खेळाडूंपैक्षा अधिक यश मिळवलं आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. त्याने लीग कप, एफए कप आणि प्रीमियर लीग स्पर्धेत विजय मिळवला आहे. मुख्य बाब म्हणजे फिल फोडेन मेसी सोबत देखील खेळताना दिसून आला आहे.
३) विनिसियस ज्युनियर (vinicius jr.)
२२ वर्षीय विनिसियस ज्युनियर हा रियल मेड्रीड संघासाठी खेळतो. कमी वयात त्याने आपल्या अप्रतिम खेळाने अनेक दिग्गजांची मने जिंकली आहेत. ब्राझील संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विनिसियस ज्युनियरकडे उत्तम ड्रीबलिंग स्किल्स आहेत. येणाऱ्या काही वर्षांत तो अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर करू शकतो.
४) बुकायो सका (Bukayo saka) :
२१ वर्षीय बुकायो सका हा गुणवान खेळाडूंपैकी एक आहे. आर्सेनल संघासाठी फुटबॉल खेळणाऱ्या सकाने आपल्या अप्रतिम खेळाने अनेक चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. युरो २०२० स्पर्धेत त्याने दमदार खेळी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर इंग्लंड संघाने अंतिम फेरीत धडक दिली होती.
५) अर्लिंग होलेंड (Erling haaland)
नॉर्वेचा स्ट्राइकर खेळाडू असलेला अर्लिंग होलेंड इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत मँचेस्टर सिटी संघाचे प्रतिनिधित्व करतो. २२ वर्षीय अर्लिंग होलेंडने आतापर्यंत गोल्सचा पाऊस पाडला आहे. त्याने ८ सामन्यांमध्ये एकूण १४ गोल केले आहेत.
काय वाटतं? यापैकी कुठला खेळाडू लिओनेल मेस्सी आणि क्रिस्तीसानो रोनाल्डो यांचे विक्रम मोडू शकतो? कमेंट करून नक्की कळवा..