बॉलीवूडने केले हे १० अफलातून रेकॉर्डस !!
मंडळी आम्ही तुम्हाला विश्वविक्रम करण्याबद्दल माहिती दिली होती. आज आम्ही बॉलीवूडने तयार केलेले काही भन्नाट रेकॉर्ड्स बद्दल सांगणार आहोत. बॉलीवूड सारखी वर्षाला १००० च्या वर फिल्म्स बनवणारी फॅक्टरी असताना रेकॉर्ड्स बनणार नाहीत तरच नवल. पण मंडळी हे रेकॉर्ड्स सुद्धा काही साधेसुधे नाहीत बरं का. पूर्ण जगात अभिमानाने मिरवता येतील असेच आहेत.
चला तर मंडळी बॉलीवूडच्या काही भन्नाट विश्वविक्रमांबद्दल पाहूयात :
१. बाहुबली
जगातील सर्वात मोठं पोस्टर म्हणून ‘बाहुबली – दी बिगिनिंग’चं नाव विश्वविक्रमाच्या यादीत आहे.
२. कहो ना प्यार हे
हृतिकचा पहिला चित्रपट, पण एकाच वर्षात तब्बल ९२ पुरस्कार मिळवून या चित्रपटाने विश्वविक्रम केला.
३. कपूर कुटुंब
या लोकांची वेगळी ओळख करून द्यायला नको. सर्वात मोठं फिल्मी जगतात काम करणारं कुटुंब म्हणून कपूर कुटुंबाने विश्वविक्रम केला आहे.
४. कुमार सानू
तब्बल २८ गाणी एका दिवसात गाण्याचा विश्वविक्रम केलेला एकमेव गायक म्हणजे कुमार सानु.
६. अशा भोसले.
सर्वात जास्त गाणी रेकॉर्ड करणारी कलाकार म्हणून आशाताईंचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवलं गेलं.
७. जगदीश राज
हा एक गमतीदार विश्वविक्रम आहे. जगदीश राज हे ७०-८० च्या काळात हमखास पोलिसांच्या रुपात दिसायचे. शेवटी त्यांची एन्ट्री फिक्स असायची. त्यांनी तब्बल १४४ फिल्म्स मध्ये पोलिसाची भूमिका करून विश्वविक्रम केला.
८. अशोक कुमार
सर्वात जास्त (६३ वर्ष) मुख्य भूमिकेत काम केलेला एकमेव कलाकार म्हणून अशोक कुमार यांनी विश्विक्रम केला आहे. क्वचितच इतका काळ मुख्य भूमिकेत काम करणारा अभिनता त्यांच्या नंतर झाला असेल.
९. यादें (१९६४)
सर्वात कमी कलाकार असलेली फिल्म म्हणून ‘सुनील दत्त’ यांची ‘यादें’ ही फिल्म गिनीज बुक मध्ये सामील झाली आहे.
१०. भारतीय चित्रपट उद्योग
सुरुवातीलाच म्हटल्या प्रमाणे एकट्या बॉलीवूड मध्येच एका वर्षात १००० पेक्षा जास्त चित्रपट बनत असताना पूर्ण देशात अनेक भाषातून अनेक चित्रपट तयार होत असतात. यांची मोजदाद करणं कठीण आहे. पण यामुळेच जगभरात सर्वाधिक चित्रपट तयार करणारा चित्रपट उद्योग म्हणून भारतीय चित्रपट उद्योगाकडे बघितलं जातं. हा ही एक विश्वविक्रम.
©बोभाटा