'एक लाजरा न् साजरा मुखडा' गाणं कुणी गायलंय ठाऊक आहे?
मराठी सिनेमाचं एक युग ग्रामीण महाराष्ट्र आणि तमाशापटांनी गाजवलं. ब्लॅक & व्हाईट सिनेमांच्या त्या काळात गावच्या पाटलाचा मुलगा म्हणजे अरूण सरनाईक हे एक समीकरणच ठरून गेलं होतं. पण तरीही सरनाईक काही एकाच छापाच्या भूमिकांमध्ये अडकून राहिले नाहीत.
अरूण सरनाईक हे हरहुन्नरी कलावंत. अभिनयासोबत त्यांना संगीताची उत्तम जाण होती. त्यांनी काही चित्रपटांसाठी गाणी गायली. गायनासोबतच ते एक कुशल तबला आणि हार्मोनियम वादक होते. ते एका आनंदग्राम नावाच्या NGO मार्फत समाजकार्यही करत.
'भटाला दिली ओसरी' या नाटकापासून त्यांनी अभिनयक्षेत्रात प्रवेश केला. २१ जून १९८४रोजी त्यांचा अपघाती मृत्यू होईपर्यंत ते कार्यरत होते. या काळात सुमारे ५६ चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. पाहूयात आजच्या दिनी त्यांच्या कारकिर्दीतल्या काही आठवणी..
प्रथम तुज पाहता..
मुंबईचा जावई या चित्रपटातलं अरूण सरनाईकांवरती चित्रित झालेलं गाणं खूप गाजलं.
लाजरा न साजरा मुखडा-गायक
’चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ सिनेमातलं हे गाणं माहित नसलेला रसिक विरळा. खेबूडकरांच्या लेखनीतून उतरलेलं हे गाणं अरूण सरनाईक आणि उषा मंगेशकरांनी तितक्याच ठसक्यात म्हटलंय.
कुणी "काsss?" म्हटल्यावर "बघत्यात!!" हे उत्तर येणं अगदी आपसूक आहे.
पप्पा सांगा कुणाचे-गायक
घरकुल सिनेमातलं हे गाणं अरूण सरनाईक आणि राणी वर्मा यांनी गायलंय.
सवाल माझा ऐका..
अरूण सरनाईकांनी तमाशापटांतून सहसा पाटलाच्या मुलाच्या भूमिका केल्या. ’सवाल माझा ऐका’ मात्र त्याला अपवाद. यात सरनाईकांनी तमाशातल्या शाहिराची भूमिका केली होती. या सिनेमातल्या सवाल-जवाबासोबतच त्यातला कलगी-तुराही तितकाच ठसकेबाज आहे.
सिंहासन
मराठी सिनेमाच्या इतिहासात या सिनेमाचं स्थान अढळ आहे.