भाऊ! थंडीच्या दिवसांत आपल्या बाथरूमच्या फेर्या का वाढतात? माहीतीये तुम्हाला? वाचा की मग...
हिवाळा... जिकडेतिकडे पसरलेलं शुभ्र धुकं, बोचरी हवा, आणि एकंदरीत असं एकदम फ्रेश वातावरण घेऊन येणारा हा ऋतू तुम्हाला प्रिय असो वा नसो राव. पण तो सुरू झाला की तीही परत-परत यायला सुरू होते. डिस्टर्ब करायला सुरू करते. हां, तीच तीच. लघवी, सुसु, एक नंबर, जे म्हणायचं ते म्हणा. पण ती जेव्हा येते तेव्हा भल्याभल्यांना अस्वस्थ करून सोडते. मग तो कोणीही बहाद्दर असो. एकाग्रतेच्या ठिकाणी अधिराज्य गाजवणार्या सम्राटालाही विचलीत आणि डळमळीत करण्याची शक्ती तिच्या अंगी असते... खास करून थंडीच्या दिवसात. पण हे असं थंडीतच का होतं राव? या जरा पाहूया...
खरंतर आपलं शरीर म्हणजे एक अद्भुत यंत्र आहे. त्या त्या परिस्थितीनुसार ते स्वतःला अॅडजस्ट करत असतं. म्हणूनच इथे जेव्हा आपल्याला थंडी वाजायला लागते, तेव्हा आपल्या शरीराचं तापमान कमी व्हायला लागतं. आता तुम्हाला तर माहितीच असणार.. शरीराला कार्य करण्यासाठी या तापमानाची, म्हणजेच उष्णतेची किती गरज असते ते. म्हणूनच ही उष्णता वाचवण्यासाठी आपली बॉडी आपलं कार्यक्षेत्र कमी करते, म्हणजेच हातापायांसारख्या भागांकडे रक्ताचा प्रवाह कमी करते. आता शरीरात रक्त तर तेवढंच आहे, पण रक्त फिरण्यासाठी जागा कमी पडायला लागली. त्यामुळे आपल्या शरिराचं ब्लड प्रेशरही वाढतं.
हे ब्लड प्रेशन वाढलं की आपली किडनी आपलं रक्त शुद्धीकरणाचं काम नेहमीपेक्षा जास्त वेगाने करायला लागते. मग काय? किडनी जेवढं रक्त शुध्द करेल, तेवढंच हे अनावश्यक पाणीही बाहेर टाकेल. म्हणूनच तुम्हाला सारखं सारखं लघवीला येतं. किडनीच्या या कामाला 'कोल्ड डाइरीसीस' असं म्हणतात.
काहीजण या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी थंडीच्या दिवसात पाणी पिणंच कमी करतात राव. पण त्याचा काही फायदा नाही. तुम्हाला शू तर लागणारच. वर भर म्हणून तुमच्या शरिरात पाण्याची कमतरता भासली, की दुसरे भलतेच प्रॉब्लेम्स निर्माण होतील. त्यामुळे जास्त विचार न करता हिवाळा एन्जॉय करा...
आणि हो, आवडलं तर लाईक आणि शेअरही करा...