मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

'बुरिडन्स ॲस': परिपूर्णतेच्या नादात न घेतलेला निर्णय म्हणजे 'अ‍ॅनालिसिस पॅरालिसिस'

3 मिनिट वाचन

अतिविचार आणि सर्वोत्तम पर्यायाच्या शोधात निर्णयच न घेऊ शकणाऱ्या मानसिकतेवर भाष्य करणारी 'बुरिडन्स ॲस'ची प्रसिद्ध रूपक कथा.

शेअर करा:
'बुरिडन्स ॲस': परिपूर्णतेच्या नादात न घेतलेला निर्णय म्हणजे 'अ‍ॅनालिसिस पॅरालिसिस'

'बुरिडन्स ॲस': परिपूर्णतेच्या नादात न घेतलेला निर्णय= 'अ‍ॅनालिसिस पॅरालिसिस'

मुंबईच्या एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ३० वर्षांचा एक तरुण आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनकडे सलग दोन तास टक लावून बसला आहे.समोर दोन ईमेल्स आहेत—दोन्हीमध्ये पगार, पद आणि सोयीसुविधा अगदी सारख्याच आहेत. घड्याळाचा काटा पुढे सरकतोय, पण त्याचा हात 'ॲक्सेप्ट' बटणावर जात नाहीये. त्याला भीती वाटतेय की चुकीचा निर्णय झाला तर? यालाच मानसशास्त्रात 'अ‍ॅनालिसिस पॅरालिसिस' म्हणतात.

१४ व्या शतकात फ्रेंच तत्वज्ञ जीन बुरिडन यांनी या मानसिक अवस्थेवर एक मार्मिक उदाहरण दिले होते. याला जग 'बुरिडन्स ॲस' (Buridan's Ass) म्हणून ओळखते. बुरिडन यांनी एका गाढवाची कल्पना मांडली होती. हे गाढव अत्यंत तर्कनिष्ठ आणि विचार करणारं होतं. त्याच्या समोर दोन गवताच्या पेंढ्या ठेवल्या होत्या.या दोन्ही पेंढ्यांचा आकार, चव आणि अंतर अगदी सारखं होतं. गाढव विचार करू लागलं की नक्की कोणती पेंढी खावी? दोन्ही पर्याय सारखेच उत्तम असल्याने ते गाढव गोंधळून गेलं. ते विचार करत राहिलं, तर्क लढवत राहिलं आणि शेवटी निर्णय न घेऊ शकल्यामुळे भुकेने मरून गेलं.

हे गाढव मूर्ख नव्हतं, तर ते गरजेपेक्षा जास्त 'रॅशनल' होतं. वस्तुस्थिती अशी आहे की, आपणही अनेकदा अशाच गाढवासारखे वागतो. एखादा निर्णय घेताना आपण 'बेस्ट' पर्यायाच्या शोधात असतो. आपल्याला खात्री हवी असते की आपण निवडलेला मार्गच सर्वात अचूक आहे. यामागचं कारण म्हणजे आपली परिपूर्णतेची ओढ. जीन बुरिडन यांच्या मते, अतिविचार करणारे लोक प्रत्येक निर्णयाला एक गणिती कोडं समजतात. त्यांना वाटतं की प्रत्येक समस्येला एकच 'परफेक्ट' उत्तर असतं. ते उत्तर मिळेपर्यंत ते थांबून राहतात आणि हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरते.

विज्ञानाची कमाल पहा, आज २०२६ मध्ये आपल्याकडे हजारो पर्याय उपलब्ध आहेत. ई-कॉमर्स साईटवर एक साधा शर्ट घ्यायचा असला तरी आपण १०० रिव्ह्यू वाचतो. या ओव्हर-इन्फॉर्मेशनच्या काळात निर्णय घेण्याची क्षमता वाढण्याऐवजी कमी झाली आहे. विश्लेषकांच्या मते, जितके जास्त पर्याय, तितका जास्त मानसिक ताण वाढतो.सोप्या भाषेत सांगायचे तर, 'परफेक्ट' हे 'गुड'चं शत्रू आहे. एखादा निर्णय चांगला असणं पुरेसं असतं, तो सर्वोत्तमच असायला हवा असा अट्टहास नडतो. आयुष्यात अनेकदा दोन पर्याय सारखेच असतात. अशा वेळी कोणता तरी एक निवडून पुढे जाणं हेच शहाणपणाचं असतं. यशस्वी लोक निर्णय घेण्यासाठी पूर्ण माहितीची वाट पाहत नाहीत. ते ७० टक्के माहिती हातात आली की कृती करतात. कारण वेळ निघून गेल्यावर घेतलेला 'परफेक्ट' निर्णय हा वेळेत घेतलेल्या 'साध्या' निर्णयापेक्षा नेहमीच कमकुवत असतो.

बुरिडन आपल्याला हेच शिकवतात की जीवनात नेहमीच स्पष्ट रस्ता दिसेल असे नाही. काही वेळा अंधारातच पाऊल टाकावं लागतं. आपण निवडलेला पर्याय सर्वोत्तम होता की नाही, हे कधीच कळणार नसतं. पण भुकेने मरण्यापेक्षा समोर दिसेल ती गवताची पेंढी खाणं कधीही चांगलं.

तुमच्या समोरच्या दोन पेंढ्यांपैकी आल्याच तर ? कोणती निवडणार ? की गाढवासारखा विचार करत थांबणार?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

अहंकार की आत्मविश्वास? जागतिक अहंकार जागरूकता दिनानिमित्त विशेष विश्लेषण
आरोग्य

अहंकार की आत्मविश्वास? जागतिक अहंकार जागरूकता दिनानिमित्त विशेष विश्लेषण

जागतिक अहंकार जागरूकता दिनानिमित्त अहंकार आणि आत्मविश्वास यातील फरक आणि मानसिक आरोग्यासाठी नम्रतेचे महत्त्व सांगणारे विश्लेषण.

११ मे, २०२६

गोळ्या खोट्या होत्या, पण लक्षणं खरी; मेंदूने शरीरावर कसा ताबा मिळवला?
आरोग्य

गोळ्या खोट्या होत्या, पण लक्षणं खरी; मेंदूने शरीरावर कसा ताबा मिळवला?

अँटीडिप्रेसंट गोळ्या खाल्ल्याच्या केवळ कल्पनेने तरुणाचा रक्तदाब कोसळला; मानवी मन आणि शरीराचा थक्क करणारा किस्सा.

१३ ऑगस्ट, २०२६

तुमच्या मनाचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात नाही: सिगमंड फ्रॉइडचे क्रांतीकारी विचार
विज्ञान

तुमच्या मनाचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात नाही: सिगमंड फ्रॉइडचे क्रांतीकारी विचार

सिगमंड फ्रॉइड यांच्या १७० व्या जयंतीनिमित्त, मानवी मन आणि सुप्त मनाच्या शक्तीचा उलगडा करणारा विशेष लेख.

६ मे, २०२६