२७ जुलैला दिसणार तब्बल पावणेदोन तासांचं ग्रहण, जाणून घ्या हे ग्रहण खास का आहे ते

राव सांगतोय ती तारीख लक्षात ठेवा. तारीख आहे २७ जुलै २०१८. राव, अजून जून आलेला नाही पण आम्ही जुलैच्या बाता का मारतोय ? तर त्याचं कारण लय खास हाय राव. या तारखेला शंभर वर्षातील सर्वात मोठं चंद्रग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण तब्बल १ तास ४३ मिनिट बघता येईल. राव म्हणूनच संपूर्ण जगाचं लक्ष या तारखेकडे लागून राहिलं आहे.

चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या अगदी मध्यातून जाणार असल्याने हे चंद्रग्रहण सर्वात मोठं असणार आहे. याला ‘उंबर’ म्हणतात. पृथ्वी आणि चंद्राचं स्थान देखील यात महत्वाची भूमिका बजावेल. चंद्र एका विशिष्ट स्थानात असताना पृथ्वी सूर्यापासून अगदी दूरच्या बिंदूवर असेल. त्यामुळे होणार असं की, पृथ्वीला चंद्रावर जास्त मोठी सावली पाडता येईल आणि चंद्रग्रहणाचा कालावधी वाढेल.

स्रोत

मंडळी, हे चंद्रग्रहण जगात सगळीकडून पाहता येणार नाही. पण घाबरू नका, ज्या मोजक्या देशातून ग्रहण दिसणार आहे त्यात भारताचा समावेश आहे राव.

असाच चंद्रग्रहणाचा प्रसंग १६ जुलै, २००० साली आला होता. त्यावेळी ४७ मिनिटापर्यंत चंद्रग्रहण पाहता आलं होतं. यानंतर १८ वर्षांनी होणारं चंद्रग्रहण सर्वात मोठं असणार आहे.

मग तयार आहात ना ? तारीख लक्षात ठेवा.....आणि हो, कॅमेरा, दुर्बीण सज्ज ठेवा ! नाही तर म्हणाल सांगितलं नाही !!

 

आणखी वाचा :

सूर्य अदृश्य झाला तर काय होईल भाऊ ?

शनिवार स्पेशल : पृथ्वीबद्दल या १० रंजक गोष्टी माहित आहेत का ?

सबस्क्राईब करा

* indicates required