मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

यशाचं 'पंचामृत': या ५ मानसिक वृत्ती तुम्हाला गर्दीतून बाहेर काढतील

3 मिनिट वाचन

शार्क, ससाणा, रानगवा, कोल्हा आणि मुंगी यांच्या नैसर्गिक वृत्तींतून शिकण्यासारख्या ५ यशाच्या प्रभावी मानसिक पद्धती.

शेअर करा:
यशाचं 'पंचामृत': या ५ मानसिक वृत्ती तुम्हाला गर्दीतून बाहेर काढतील

आपण तंत्रज्ञानाच्या जगात 'हाय-स्पीड' इंटरनेट वापरतोय,पण आपली मानसिक प्रगती मात्र अजूनही 'टू-जी'च्या वेगाने अडखळत चालली आहे.विचार करण्यासारखं असं की,आधुनिक विज्ञानाने आपल्याला सोयी दिल्या,पण जगण्याची ती धार मात्र निसर्गाकडूनच शिकावी लागते.

१. शार्क मेंटालिटी (Shark Mentality): शार्क मासा जर पोहायचा थांबला, तर त्याच्या कल्ल्यांतून ऑक्सिजन जाणं बंद होतं आणि तो मरतो. हीच गोष्ट आपल्या मेंदूला लागू होते. 'आता कुठे स्थिर स्थावर झालोय' हा विचार म्हणजे प्रगतीची आत्महत्या आहे.सतत शिकत राहणं आणि स्वतःला अपडेट करणं ही चैन नसून जगण्याची गरज आहे.

२. फाल्कन मेंटालिटी (Falcon Mentality): ससाणा जेव्हा शिकार करतो, तेव्हा त्याचं लक्ष फक्त लक्ष्यावर असतं, आजूबाजूच्या कावळ्यांच्या गोंधळावर नाही.आजच्या 'नोटिफिकेशन' आणि 'रील्स'च्या जमान्यात ज्याला एका कामावर लक्ष केंद्रित करता येतं,तोच खरा बाजीगर.अर्जुनाचा डोळा ही केवळ गोष्ट नाही, तर ती एक उच्च दर्जाची 'फोकस' करण्याची कला आहे.

३.बायसन मेंटालिटी (Bison Mentality): रानगवा किंवा बायसन हा एकमेव प्राणी आहे जो वादळ आलं की त्याच्या विरुद्ध दिशेला न पळता, वादळाच्या रोखाने धावतो. संकट टाळल्याने ते संपत नाही, उलट भीती वाढत जाते. संकटाच्या डोळ्यात डोळे घालून भिडण्याची वृत्तीच तुम्हाला लवकर बाहेर काढू शकते.

४. फॉक्स मेंटालिटी (Fox Mentality): कोल्ह्याची हुशारी म्हणजे केवळ लबाडी नाही, तर ती 'स्ट्रॅटेजी' आहे. आपल्याकडे 'कष्टाचं फळ मिळतं' असं म्हटलं जातं,पण ते कष्ट कोणत्या दिशेला आहेत हे कोल्ह्यासारखं ओळखावं लागतं. नुसती मेहनत गाढवही करतं,पण चाणाक्यनीती सांगते की दिशाहीन कष्ट म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.

५. अँट मेंटालिटी (Ant Mentality): मुंगी कधीही 'मोटिव्हेशनल' भाषणाची वाट पाहत नाही.ती रोज आपलं काम शांतपणे करत राहते. थेंबे थेंबे तळे साचे,हे आपल्या संस्कृतीचं सूत्र मुंग्यांकडून शिकलं पाहिजे.मोठ्या यशाच्या मागे नेहमी लहान पण सातत्यपूर्ण कृतींचा डोंगर असतो.

आयुर्वेदात यालाच 'सत्त्व' गुण वाढवणं म्हणतात. मनाचं आरोग्य केवळ औषधांनी नाही, तर विचारांच्या शिस्तीने सुधारतं. डॉक्टरांचा सल्ला शारीरिक व्याधींसाठी हवाच, पण मानसिक कणखरतेसाठी निसर्गाच्या या शाळेत प्रवेश घेणं अनिवार्य आहे.

ज्याला स्वतःच्या मनावर ताबा मिळवता आला, त्याला जगावर ताबा मिळवणं फारसं कठीण जात नाही.तुमची आजची धडपड उद्याचा इतिहास ठरणार की विस्मरणात जाणार, हे फक्त तुमच्या निवडीवर अवलंबून आहे.

पुढची गोष्ट
विज्ञानजंगलातलं गुप्त औषधालय: जेव्हा प्राणी स्वतःच स्वतःचे डॉक्टर बनतात!ओरांगुटाण, माकडं आणि हत्ती स्वतःवर उपचार करण्यासाठी निसर्गाचा वापर कसा करतात? प्राण्यांच्या 'झू-फार्माकोग्नोसी' या अजब विज्ञानाची रंजक माहिती.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

प्राण्यांच्या जगात नको असलेल्या प्रेमाला नकार कसा दिला जातो?
विज्ञान

प्राण्यांच्या जगात नको असलेल्या प्रेमाला नकार कसा दिला जातो?

प्राण्यांच्या जगात नको असलेल्या नरापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ड्रॅगनफ्लाय आणि इतर प्रजातींच्या माद्या चक्क मेल्याचं नाटक करतात!

२६ सप्टेंबर, २०२६

जेव्हा स्वतःची घागर स्वतः भराल, तेव्हाच कळेल निसर्गाची खरी किंमत!
लाइफस्टाइल

जेव्हा स्वतःची घागर स्वतः भराल, तेव्हाच कळेल निसर्गाची खरी किंमत!

फुकट मिळणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीची नासाडी आणि भविष्यातील पाणी टंचाईच्या संकटावर प्रकाश टाकणारा विचारप्रवर्तक लेख.

१० जून, २०२६

अँथुरियम: ज्याला आपण प्लास्टिक समजतो, तेच खरं अस्सल 'रॉयल' फूल आहे!
लाइफस्टाइल

अँथुरियम: ज्याला आपण प्लास्टिक समजतो, तेच खरं अस्सल 'रॉयल' फूल आहे!

प्लास्टिकसारखे दिसणारे पण निसर्गाची किमया असलेले अँथुरियम फूल आणि त्याची निगा राखण्याच्या काही खास टिप्स.

१४ मे, २०२६

“Staying ahead of the curve” म्हणजे काय? प्रवाहाच्या पुढे असण्याचं एकाकीपण?
लाइफस्टाइल

“Staying ahead of the curve” म्हणजे काय? प्रवाहाच्या पुढे असण्याचं एकाकीपण?

समाजाच्या प्रवाहाच्या पुढे राहणाऱ्या ५ टक्के लोकांची मानसिकता आणि त्यांना सोसावं लागणारं एकाकीपण यावर भाष्य करणारा हा लेख.

२८ मार्च, २०२६